अमरावती ZP : भाजपची त्सुनामी कॉंग्रेसने रोखली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

बहुमतासाठी कॉंग्रेसला केवळ 2 सदस्यांची आवश्‍यकता असून अपक्ष तसेच आमदार रवि राणा यांच्या आघाडीचा आधार घेऊन कॉंग्रेस अमरावती सत्ता संपादन करू शकेल.

नागपूर : राज्यात सर्वत्र भाजपची सरशी होत असताना अमरावती जिल्हा परिषदेत मात्र कॉंग्रेसने भाजपचा विजयी रथ रोखला आहे. अमरावती जिल्हा परिषदेत कॉंग्रेसने 59 पैकी 27 जागांवर विजय संपादन केला आहे.

अमरावती महापालिकेत भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. या निवडणुकीत कॉंग्रेसने आरपीआयसोबत आघाडी केली होती. आरपीआयचा एक उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे कॉंग्रेस आघाडीची संख्या 28 होते. बहुमतासाठी कॉंग्रेसला केवळ 2 सदस्यांची आवश्‍यकता असून अपक्ष तसेच आमदार रवि राणा यांच्या आघाडीचा आधार घेऊन कॉंग्रेस अमरावती सत्ता संपादन करू शकेल.

अमरावती जिल्हा परिषदेत भाजपला चांगली कामगिरी करता आली नाही. अमरावती जिल्हा परिषदेत भाजपचे 14 सदस्य निवडून आले आहेत. उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्या नेतृत्वावरच या निवडणुकीने प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने चांगले यश मिळविले होते. परंतु जिल्हा परिषदेत यशाची ही मालिका टिकविता आली नाही.

कॉंग्रेसला बहुमत मिळाल्याने या निवडणुकीने कॉंग्रेसचे ग्रामीण भागातील नेतृत्व आमदार वीरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे) व आमदार यशोमती ठाकूर (तिवसा) यांच्या नेतृत्वावर मोहोर उमटली आहे. अत्यंत विपरित परिस्थितीमध्ये यादोन नेत्यांनी ग्रामीण भागातील कॉंग्रेसचे संघटन टिकवून ठेवले. त्याचे फळ त्यांना या निवडणुकीत मिळाले आहे.
एकेकाळी अमरावती जिल्ह्यात सेनेचा चांगलाच दबदबा होता. या निवडणुकीने सेनेला मागे टाकले आहे. या निवडणुकीत सेनेला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले.

पक्षीय बलाबल अमरावती
कॉंग्रेस- 27
भाजप- 14
एनसीपी- 5
प्रहार- 4
बीएसपी- 1
युवा स्वाभिमान- 2
शिवसेना- 3
आरपीआय- 1
अपक्ष- 2

विदर्भ

अकोला : गतवर्षी सामाजिक वनिकरण विभाग अकोल्याला विदर्भातील ‘पहिली’ ‘प्लांट टिशू कल्चर लॅब’ मंजूर झाली होती. त्यामुळे जिल्ह्यात...

10.12 AM

नागपूर - शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला असून, यासाठी ऑनलाइन अर्जाची अट घातली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया...

09.09 AM

नागपूर - शिक्षण आणि नोकरीत तसेच आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी जातवैधता प्रमाणपत्र द्यावे लागते. मात्र, आता शेती लाभाच्या योजनेसाठीही...

09.09 AM