कंत्राटी कामगारांना नियमानुसार सर्व लाभ द्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मार्च 2017

नागपूर - महानिर्मितीचे कार्यकारी संचालक (मानव संसाधन) विनोद बोंदरे यांची कोराडी वीज केंद्राला भेट दिली. या वेळी त्यांनी कंत्राटदारांची बैठक घेऊन कंत्राटी कामगारांशी संबंधित विषयावर चर्चा केली. कामगारांना नियमानुसार सर्व लाभ देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

वीज प्रकल्पातील कंत्राटी कामगारांकडून समस्यांबाबत आंदोलक पवित्रा घेतला जातो. या पार्श्‍वभूमीवर त्यांची ही भेट महत्त्वाची आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यातदेखील त्यांनी कोराडी वीज केंद्रातील कंत्राटी कामगारविषयक बाबींची प्रत्यक्ष तपासणी केली होती.

कंत्राटी कामगारांची संख्या, त्यांना दिले जाणारे वेतन व भत्ते, वेतन देण्याची पद्धती, कामगारांचे प्रश्‍न आदी विष्यावंर त्यांनी कामगार पुरविणाऱ्या कंत्राटदार कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून माहिती घेतली. कामगारांना नियमानुसार वेतन व अन्य भत्ते दिले जातात की नाही याबाबत त्यांनी संबंधितांकडे विचारणा केली. वेतन-भत्ते बॅंकेतूनच दिले जात असल्याची खातरजमा त्यांनी करून घेतली. याप्रसंगी कोराडी वीज केंद्राचे मुख्य अभियंते पंकज सपाटे, प्रभाकर निखारे, अनंत देवतारे, उपमुख्य अभियंते विवेक रोकडे, गिरीश कुमरवार, अरुण वाघमारे, राजेश कराडे, अधीक्षक अभियंते किशोर उपगन्लावार, विनोद कारगावकर, राहुल सोहोनी, विराज चौधरी, बी. जी. भगत, तुकाराम हेडाऊ, जे. बी. पवार, परमानंद रंगारी, प्रभारी अधीक्षक अभियंता डॉ. भूषण शिंदे, नंदकिशोर चन्ने आदी उपस्थित होते. संचालन उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मुकेश मेश्राम यांनी केले. बैठकीनंतर त्यांनी ६६० मेगावॉटच्या जलप्रक्रिया विभाग व राख बंधाऱ्याला भेट दिली. या वेळी अधिकारी, अभियंते, तंत्रज्ञ, कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित महानिर्मितीचे कोराडी येथील तीन संचांबाबतही त्यांनी माहिती घेतली.

Web Title: Contract workers pay all the benefits of routine