वादग्रस्त गटविकास अधिकारी वाघमारे यांचे स्थलांतरण

मनोहर बोरकर
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

एटापल्ली (गडचिरोली) : येथील वादग्रस्त गटविकास अधिकारी अनिल वाघमारे हे अकार्यक्षम असून त्यांच्या कर्तव्य काळाची चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी पंचायत समिती सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, आदिवासी विद्यार्थी संघटना व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रशासनाला वेळोवेळी निवेदनातून केले होती त्यामुळे (ता. 31) मंगळवारी गटविकास अधिकारी यांचे बदलीचा आदेश धड़कताच सर्व पदाधिकारी व नागरिकांनी प्रशासनाप्रती समाधान व्यक्त केले.

वाघमारे हे एटापल्ली पंचायत समितीत रुजू झाले पासून त्यांनी एक दिवसही मुख्यालयी हजार राहून कर्तव्य बजावले नाही. त्यामुळे तालुक्याच्या विकासावर विपरीत परिणाम झाला असून लाभार्थी कुटुंबे उघड़यावर आली असल्याचे निवेदनातून नमूद केले होते.

वाघमारे हे रुजू झाले पासून मुख्यालयी उपस्थित न राहता पस्तीस किमी अहेरी या शहरातून ये-जा करीत होते व महिन्यातील आठ ते दहा दिवस गैरहजर राहत असत, त्यामुळे इतरही विस्तार अधिकारी व कर्मचारी हे बाहेरील शहरातून ये-जा करून कर्तव्य बजावत आहेत. परिणामी विकास कामे व योजनांवर विपरीत परिणाम होऊन, घरकुल, शौचालय, सिंचन विहिरी, व इतर शेतकरी, शेतमजूर,व विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शासकीय लाभाच्या योजनांपासून वंचित रहावे लागत आहे. 

तालुक्यातील ग्रामपंचायत उडेरा, गुरूपल्ली, येमली, पुरसलगोंदी, जाम्बिया, कसनसुर, वाघेझरी, जारावंडी, गट्टा, इत्यादी 31 ग्रामपंचयती अंतर्गत नागरिकांना शौचालय, घरकुल, सिंचन विहिरी व इतर योजना शासन स्तरावरून मंजूर करण्यात आल्या त्यामुळे लाभार्थ्यांनी पदरमोड करून मंजूर बांधकामें पूर्ण केली मात्र एक ते दोन वर्षाचा कालावधी होऊनही मंजूर निधी रक्कम लाभार्थ्यांना मिळाली नाही त्यामुळे लाभार्थी नागरिकांचे संसार उघड़यावर आले असून कुटुंबांवर उपासमारीची पाळी आली आहे 

तसेच पंचायत समिती मालकीच्या मुख्य बाजारपेठेतील दोन ते तीन एकर भूखंडावर भूमाफियांचे बेधड़क अतिक्रमण करून भूखंड हड़प करण्याचा प्रकार होतांना गटविकास अधिकारी वाघमारे हे नागरिकांचे तक्रारीकड़े जानीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही निवेदनातून केला होता.

त्यामुळे अशा अकार्यक्षम गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांचे संपूर्ण कार्यकाळाची सखोल चौकशी करून कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी पंचायत समिती, जिल्हा परिषद व विविध पक्ष संघटना पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे केल्याने वाघमारे यांचे स्थलांतरन झाल्याचे बोलले जात आहे.

Web Title: controversial block development officer transfer