महापालिकेत महिलांची ताकद वाढली 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

नागपूर - शहराच्या महापौरपदी यंदा महिला विराजमान होणार आहे. त्यांच्यासोबत सभागृहातील 81 नगरसेविकांसह महिलांची ताकद पुरुषांच्या तुलनेत चांगलीच वाढली आहे. मागील पाच वर्षांच्या कार्यकाळाच्या तुलनेत आठ नगरसेविकांची भर पडली. मात्र, टक्केवारीनुसार मागील नगरसेविकांच्या तुलनेत यावेळी तीन टक्‍क्‍यांनी वाढ झाली. 

नागपूर - शहराच्या महापौरपदी यंदा महिला विराजमान होणार आहे. त्यांच्यासोबत सभागृहातील 81 नगरसेविकांसह महिलांची ताकद पुरुषांच्या तुलनेत चांगलीच वाढली आहे. मागील पाच वर्षांच्या कार्यकाळाच्या तुलनेत आठ नगरसेविकांची भर पडली. मात्र, टक्केवारीनुसार मागील नगरसेविकांच्या तुलनेत यावेळी तीन टक्‍क्‍यांनी वाढ झाली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गृहनगरातील महापौरांकडे राज्याचे लक्ष लागले आहे. भाजपच्या 63 महिला निवडून आल्या आहेत. यातील एक नगरसेविका महापौर होणार आहे. महापालिकेत 50-50 आरक्षणानुसार 151 सदस्य असलेल्या महापालिकेत पुरुषांचासाठी 75, तर महिलांसाठी 76 जागा आरक्षित होत्या. मात्र, काही महिलांनी सर्वसाधारण गटातून उमेदवारी दाखल केली. यातून सहा महिला निवडून आल्या असून, त्यांची संख्या आता 82 वर पोहोचली. त्यामुळे महापालिकेत आता महिलांची टक्केवारी 54 वर पोहोचली असून, पुरुषांची संख्या 46 टक्‍क्‍यांपर्यंत घटली. 

2012 मध्ये 145 सदस्यांच्या सभागृहात 74 महिला सदस्या निवडून आल्या होत्या. त्यामुळे सभागृहात महिलांची टक्केवारी 51, तर नगरसेविकांची टक्केवारी 49 अशी होती. यावेळी 151 सदस्य झाल्याने महिलांची संख्या वाढलीच, निवडणुकीनंतर त्यात आणखी भर पडली. यामुळे सभागृहात अध्यक्षपदी असलेल्या महिला महापौरांवर नगरसेवकांकडून आरोप-प्रत्यारोप होताना या सदस्या काय भूमिका घेतील? याकडे लक्ष लागले आहे. 

सध्या भाजपच्या 63, कॉंग्रेसच्या 13, बसपच्या 4, शिवसेना 1, अपक्ष 1 अशी नगरसेविकांची संख्या आहे. भाजपमध्ये नगरसेवक 45 असून नगरसेविकांची संख्या त्यांच्यापेक्षा 18 ने अधिक आहे. कॉंग्रेसचे एकूण 29 सदस्य असून, यात 13 नगरसेविका व 16 नगरसेवक आहे. बसपच्या 10 सदस्यांपैकी 4 नगरसेविका, तर 6 नगरसेवक आहेत. सेनेचे प्रत्येकी 1 नगरसेवक व नगरसेविका आहेत. त्यामुळे सर्वाधिक महिला भाजपमध्येच आहे. 

मतदानात मात्र निरुत्साह 
शहरातील एकूण 20 लाख 93 हजार 392 मतदारांपैकी 10 लाख 22 हजार 401 महिला मतदार आहेत. मंगळवारी झालेल्या मतदानात केवळ 5 लाख 34 हजार 358 महिलांनी मतदान केले. त्या तुलनेत 5 लाख 90 हजार 273 पुरुषांनी मतदान केले. महिलांच्या मतदानाची संख्या पुरुषांच्या तुलनेत 55 हजार 915 कमी असल्याने मतदानात मात्र त्यांचा निरुत्साह दिसून आला. 

Web Title: Corporation increased the strength of women