कपाशीला बोंडअळी अन् सोयाबीनला भावाचे ग्रहण ; शेतकरी संभ्रमात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

अकोला ः कपाशी पेरायची तर बोंडअळीची भीती अन् सोयाबीनला भावच नाही. त्यामुळे यंदाच्या खरिपात कापूस पेरायचा की, सोयाबीन या विवेंचनेत शेतकरी अडकला आहे.

केरळमध्ये मॉन्सूनचा प्रवेश झाला आहे. लवकरच मध्य महाराष्ट्र व पंधरा दिवसात अकोल्यासह वऱ्हाडात मॉन्सून पोहचण्याचे संकेत आहेत. त्यामुळे खरीप पेरणीसाठी केवळ पंधरा दिवसाचा कालावधी उरला आहे. त्यामुळे पीक निवड, मशागत, बियाणे, खते खरेदीची लगबग सुरू झाली आहे. परंतु, जिल्ह्यासह विदर्भात खरिपातील प्रमुख पीक म्हणून कापूस व सोयाबीनची पेरणी केली जाते. त्यामुळे पेरणी क्षेत्राचे पीक निहाय तुलनात्मक विचार केल्यास सर्वाधिक पेरा सोयाबीन व कपाशीचे राहाते.

मात्र, गेल्या हंगामात कपाशीवर गुलाबी बोंडअळीने हल्ला केल्याने, कापसाचे ५० टक्के उत्पादन घटले होते. प्रादुर्भावासाठी बोंडअळीमध्ये बीटी तंत्रज्ञानाविरूद्ध प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचे कारण तज्ज्ञांद्वारे देण्यात आले. त्यामुळे यंदाही कपाशीवर गुलाबी बोंडअळी हल्ला करेल याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. दुसरे प्रमुख पीक सोयाबीन परंतु, वर्षभर सोयाबीनला हमीभाव मिळू शकला नाही. शिवाय पाऊस व वातावरणाच्या लहरिपणामुळे उत्पादनही घटले होते. त्यामुळे दोन्ही पिकांतून उत्पादन खर्च निघाला नाही. या कारणाने यंदा कपाशी पेरावी की, सोयाबीन या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.

  • बियाणे निवडीचा संभ्रम

बोगस, गुणवत्ता ढासळले, मुदतबाह्य, कमी दर्जाचे व विविध कीडी रोगांविरुद्ध प्रतिकार शक्ती नसलेले बियाण्याची विक्री बाजारात होत असल्याने, गत हंगामात विविध कीडी, रोगांना पिके बळी पडल्याची चर्चा होती. त्यामुळे खरेदी करताना कोणते बियाणे खात्रीचे याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रामवस्था आहे.

  • मोजक्याच बियाणे उत्पादक कंपन्यांना परवानगी

शेतकऱ्यांची बियाणे खरेदीवेळी फसवणुक होऊ नये, यादृष्टीने कृषी विभागाने सतर्कता बाळगत, यंदा केवळ ४२ कापूस व ७३ सोयाबीन उत्पादक कंपन्यांना बियाणे विक्रीची परवानगी दिली आहे.

''सोयाबीन हे प्रथम पर्यायी पीक आहे. मात्र, गत हंगामात भाव मिळाला नाही त्यामुळे सोयाबीन पेरणीबाबत शेतकरी उदासीन आहेत. कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा धोका कायम असल्याने, कापसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घसरेल. तरीसुद्धा सर्व शेतकरी कपाशी व सोयाबीन पेरणीसंदर्भात संभ्रमावस्थेत आहेत. मॉन्सूच्या आगमनावरही ते निर्भर राहील.''
- गणेश श्यामराव नानोटे, शेतकरी, बार्शी टाकळी

Web Title: cotton is Infect boll worm and soyabin's rates are increasing ; Farmer confuse