अकराशे किलो गोमांस अकोल्यातून जप्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

अकोला - शहरातील अवैध कत्तलखान्यातील गोमांस औरंगाबाद येथे विक्रीस नेण्यात येत असल्याचा प्रकार स्थानिक गुन्हे शाखेच्या छाप्यामध्ये सोमवारी उघडकीस आला. पोलिसांनी नीता गेस्ट हाउसजवळ ही कारवाई करून दोघांना अटक केली असून, सव्वादोन लाख रुपयांच्या गोमांसासह गाडीही जप्त केली.

कत्तलखान्यातील गोमांस ड्रममध्ये बर्फात ठेवून त्यावर मिरचीचे पोते व त्याखाली हिरवी ताडपत्री टाकून ते बाहेर गावी पाठविण्यात येते. अशाच प्रकारे सोमवारी गाडीमध्ये 250 लिटरच्या 11 प्लॅस्टिक ड्रममधीन अकराशे किलो गोमांस औरंगाबादला पाठविण्यात येणार होते; मात्र अकोल्यातून बाहेर पडण्यापूर्वीच पोलिसांनी ही गाडी जप्त केली. त्यात गोमांस व ड्रम असे एकूण दोन लाख 18 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी राजू दशरथ कांबळे (रा. स्नेहनगर, सिल्लोड, जि. औरंगाबाद), शेख अहेमद शेख रहीम (रा. जमा मस्जिदजवळ सिल्लोड, जि. औरंगाबाद) यांना अटक केली आहे. त्यांना मंगळवारी (ता. 9) न्यायालयात हजर करणार आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

विदर्भ

वर्धा : आष्टी तालुक्यातील वडाळा येथील शेतकरी शेतातून बैल घरी परत आणत असताना एका वाघिणीने हल्ला चढवला. या हल्ल्यात बैल पळून...

03.42 PM

एटापल्ली (जिल्हा गडचिरोली) : तालुक्यातील कसनसुर जारावंडी मुख्य रस्त्यावरून वाहणारे झुरी नाला व कांदळी नाल्यावरील पुलाचे नुकसान...

02.09 PM

नागपूर - केंद्र सरकारने तूर, उडीद आणि मूग डाळींवरील निर्यातबंदी उठवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या डाळीसह कडधान्यांच्या भावात दोनशे ते...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017