शोषण करणाऱ्या बापाला कारावास

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

10 वर्षे कारावास व 10 हजार दंड
नागपूर - स्वतःच्या पोटच्या मुलीवर अत्याचार करून तिला गरोदर करणाऱ्या बापाला 10 वर्षे कारावासाची आणि 10 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अबू सालेम (नाव बदलेले) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणातील सर्व साक्षीदार फितूर झाले असताना केवळ डीएनए चाचणीच्या अहवालावरून आरोपीला शिक्षा ठोठावण्यात आली.

10 वर्षे कारावास व 10 हजार दंड
नागपूर - स्वतःच्या पोटच्या मुलीवर अत्याचार करून तिला गरोदर करणाऱ्या बापाला 10 वर्षे कारावासाची आणि 10 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अबू सालेम (नाव बदलेले) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणातील सर्व साक्षीदार फितूर झाले असताना केवळ डीएनए चाचणीच्या अहवालावरून आरोपीला शिक्षा ठोठावण्यात आली.

ही घटना 28 ऑगस्ट 14 मध्ये उघडकीस आली होती. सालेम हा चौकीदार म्हणून कार्यरत होता. नांदेड येथे राहणाऱ्या एका कुटुंबाच्या रिकाम्या घराची तो रखवाली करीत असे. त्याचे भाजीचे दुकानसुद्धा होते. ज्या घरी तो चौकादारी करण्यास असे तेथे तो कधी कधी त्याच्या मुलीला घेऊन जात असे. या घराच्या साफसफाईकरिता आपण हिला तेथे नेत असल्याचे तो सांगत असे. घरातच तो आपल्या स्वतःच्या पोटच्या मुलीवर अत्याचार करायचा. ही बाब कोणाला सांगायची नाही, अशा धमक्‍या तो तिला देत असे. कालांतराने मुलीला बापाकडून दिवस गेले. ती आठ महिन्यांची गर्भवती असताना ही बाब प्रकर्षाने समोर आली. सालेमच्या शेजाऱ्यांनासुद्धा ही बाब लक्षात आली. या मुलीची आई सालेमच्या पत्नीने या प्रकरणी जरीपटका पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणी सालेमवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. याप्रकरणी सहाय्यक सरकारी वकील ज्योती वजानी यांनी बाजू मांडली. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यावर न्या. के. जी. राठी यांनी आरोपीला दोषी ठरविले व शिक्षा ठोठावली.

ऐतिहासिक निर्णय
पोटच्या मुलीवर अत्याचार करणारा हा प्रकार अत्यंत किळसवाणा तेवढाच धक्कादायक आहे. अनेक प्रकरणात साक्षीदार फितूर होतात. यामुळे आरोपींची सुटका होते. मात्र, न्यायालयाने डीएनए चाचणीच्या आधारावर शिक्षा ठोठावली.
- ऍड. ज्योती वजानी

विदर्भ

काँग्रेस भवनात गर्दी - मनपा निवडणुकीनंतर प्रथमच एका मंचावर नागपूर - महापालिका निवडणुकीतील पराभवाचे एकमेकांवर खापर...

10.12 AM

कर्जबाजारीपणासह विविध कारणांमुळे ओढवली परिस्थिती नागपूर - शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे पोळा. ज्याच्या मदतीने...

10.12 AM

नागपूर - विदर्भासह धान उत्पादक क्षेत्रामध्ये पावसाने दडी मारल्याने उत्पादन प्रभावित झाले आहे. यामुळे गेल्या पंधरा दिवसांत...

10.12 AM