राज्यातील सायबर सेल झाले अधिक 'स्ट्राँग'

जीवन सोनटक्के
बुधवार, 23 मे 2018

मोबाईलमधील डाटा डिलिट केल्यानंतरही तो पुन्हा मिळविण्याची यंत्रणा केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) नंतर आता सायबर सेलला उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 

अकोला - सोशल मीडियाचा वापर वेगाने वाढत असताना त्याच्या माध्यमातून सायबर गुन्हेही वाढत आहेत. या गुन्ह्यांवर अंकुश बसविण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. सायबर सेल अधिक सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून मोबाईलमधील डाटा डिलिट केल्यानंतरही तो पुन्हा मिळविण्याची यंत्रणा केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) नंतर आता सायबर सेलला उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ॲन्ड्रॉईड मोबाईलचा वाढलेला वापर हा सर्वांसाठी जेवढा लाभदायक आहे, तेवढात तो धोकादायकही आहे. मोबाईलवर वापरण्यात येणाऱ्या सोशल मीडिया साईटवरून अनेकांना गंडविण्याचे प्रकार घडतात. या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलिसांच्या सायबर सेलला आवश्‍यक ती यंत्रण नव्हती. परंतु, गेल्या काही वर्षांपासून गृहविभागाने सायबर सेलची स्वतंत्र यंत्रणा त्यानंतर सायबर ठाणे ही संकल्पना विकसित केली आहे. त्यानुसार त्या विभागाला नवीन तंत्रज्ञान व यंत्रणा पुरविण्यात आली. ही यंत्रणा इतकी मजबुत झाली आहे की, तिला आता कोणावर अवलंबून राहावे लागत नाही आहे. मोबाईलवरून केलेल्या गुन्ह्यांचा तपास लावताना सायबर सेलला सॉफ्टवेअरमुळे संबंधित गुन्हेगाराला बेड्या ठोकण्यात मदत झाली अाहे.

डाटा डिलिट करून पुरावे नष्ट करणे अशक्य -
एखाद्या गुन्हेगाराने मोबाईलच्या माध्यमातून काढलेले अश्‍लिल छायाचित्र, रेकॉर्डींग, संभाषण डिलिट करून तो स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न करतो. सायबर सेलला मिळालेल्या सॉफ्टवेअरमुळे गुन्हेगारांना आता डाटा डिलिट करून पुरावे नष्ट करता येणार नाही. नवीन सॉफ्टवेअरमुळे डिलिट झालेला कुठलाही डाटा मोबाईलमधून सहज रिकव्हर करता येणार आहे.

अकोला पोलिसांना पहिले यश -
अकोला सायबर सेलला मिळालेल्या सॉफ्टवेअरमुळे त्यांनी एक मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे. या गुन्ह्यामुळे गुन्हेगाराला शिक्षा होण्यास मदत झाल्याने पोलिसांचे व सायबर सेलचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The cyber cell of the state has become more Strong