डॅडीला हायकोर्टाचा दणका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 सप्टेंबर 2016

नागपूर - अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी ऊर्फ डॅडीला मंगळवारी (ता. 20) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलासा नाकारत अभिवचन रजेचा (पॅरोल) अर्ज निकाली काढला. यावर न्यायमूर्तिद्वय भूषण धर्माधिकारी व अतुल चांदूरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

नागपूर - अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी ऊर्फ डॅडीला मंगळवारी (ता. 20) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलासा नाकारत अभिवचन रजेचा (पॅरोल) अर्ज निकाली काढला. यावर न्यायमूर्तिद्वय भूषण धर्माधिकारी व अतुल चांदूरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
गवळीची पत्नी आशा गवळीवर मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी पॅरोल मिळावी, असा अर्ज गवळीने उच्च न्यायालयात केला. या वेळी आजार गंभीर असून, शस्त्रक्रिया आवश्‍यक असल्याचे गवळीच्या वकिलांनी सांगितले. यावर आक्षेप घेत सरकारी पक्षाने गवळीच्या पत्नीची काळजी घेण्यासाठी इतर कुटुंबीय सक्षम आहेत. तसेच त्याच्या पत्नीला असलेला आजार हा तितका गंभीर नसून, शस्त्रक्रियेची गरज नाही. यामुळे गवळीला पॅरोल देण्याची गरज नाही, असे न्यायालयाला सांगितले. तसेच शस्त्रक्रियेची तारीख निश्‍चित नसल्याचा मुद्दादेखील उपस्थित करण्यात आला. पत्नीच्या शस्त्रक्रियेची तारीख निश्‍चित नसल्याचे लक्षात घेत न्यायालयाने पॅरोलचा अर्ज निकाली काढला.
गवळी काही महिन्यांपूर्वी पॅरोलवर होता. यामुळे लगेच त्याला पुन्हा पॅरोल देणे योग्य होणार नाही, असे राज्य सरकारने शपथपत्रात म्हटले होते. सरकारतर्फे सरकारी वकील ऍड. नितीन रोडे, तर गवळीतर्फे वरिष्ठ अभियोक्ता अनिल मार्डीकर व ऍड. मीर नगमन अली यांनी बाजू मांडली.

विदर्भ

नागपूर - गेल्या काही वर्षांत राजकीय नेत्यांची विश्‍वासार्हता संपली होती. ही विश्‍वासार्हता पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न केले...

03.57 AM

नागपूर : रामटेक तालुक्‍यातील खरपडा येथे शनिवारी वीज कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृतांमध्ये सूरज सदाशिव...

रविवार, 25 जून 2017

१७९ रोपांची लागवड - ‘माय प्लॅंट’ ॲपवर करा नोंदणी  नागपूर - वनविभाग लोकसहभागातून एक ते सात जुलै या कालावधीत राज्यात ‘...

रविवार, 25 जून 2017