डागा रुग्णालयाला स्वच्छतेचा पहिला पुरस्कार 

डागा रुग्णालयाला स्वच्छतेचा पहिला पुरस्कार 

नागपूर - सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छता आणि आकर्षक रुग्णालयांत डागा स्मृती शासकीय रुग्णालयाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते हा पुरस्कार बहाल करण्यात आला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीमा पारवेकर आणि डॉ. माधुरी थोरात यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याच प्रकारात हिंगणा ग्रामीण रुग्णालयही पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. 

जिल्हा परिषदेच्या कै. आबासाहेब खेडकर सभागृहात हा पुरस्कार सोहळा झाला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवई, पुष्पा वाघाडे, शांताबाई कुमरे, उकेश चव्हाण, डॉ. शिवाजी सोनसरे, शुभांगी गायधने उपस्थित होते. 

सावित्रीबाई फुले कल्याण योजना, सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक पुरस्कार, कुटुंबकल्याण कार्यक्रम, फलॉरेन्स नाईटिंगल्स पुरस्कार, कायाकल्प स्पर्धा, डॉ. आनंदीबाई गोपाळ जोशी गौरव पुरस्कारांचे वितरण झाले. 

जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट आशा पुरस्कार गुमथी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शशिकला फलके यांना देण्यात आला. तर द्वितीय पुरस्कार रायपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या तिलोत्तमा भालाधरे यांना प्रदान करण्यात आला. नावीन्यपूर्ण आरोग्य सखी पुरस्कार तारसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कुंदा झाडे यांना पहिला तर व्याहाड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लक्ष्मी घरडे यांना दुसरा पुरस्कार देण्यात आला. जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट आशा गटप्रवर्तक पुरकारासाठी बेला येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुकेशनी फुलपाटील यांची निवड झाली. त्यांना प्रथम क्रमांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. द्वितीय पुरस्कार हिवराबाजारच्या कविता सलामे आणि तृतीय पुरस्कार कचारी सावंगाच्या सविता नंदकुमार उमप यांना दिला. संचालन डॉ. दीपक साळीवकर यांनी केले. आभार डॉ. संजय निकम यांनी मानले. 

कुटुंबकल्याणाचे उद्दिष्ट पूर्ण 
2016-17 मध्ये कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट पूर्ण करणारे शल्यचिकित्सक डॉ. आनंद गजभिये यांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. द्वितीय क्रमांकाचे बक्षीस डॉ. प्रदीप बिथेरिया आणि तृतीय क्रमांकाचे बक्षीस डॉ. प्रवीण भगत यांना दिले. सर्वोत्कृष्ट आरोग्य सहायक म्हणून जी. जी. गडेकर, एस. एन. थूल, एस. व्ही. धुर्वे, रजनी रंगारी, पी. जे. राऊत यांना दिला. याशिवाय उत्कृष्ट काम करणाऱ्या आरोग्य सेवकांमध्ये बळवंत खराबे, सी. एन. वासनिक, एन. एफ बालपांडे, एन. ए. डिक्रुज, मंदा बैस, एस. जे. परतेती यांचा समावेश आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com