तूरडाळ किमतीवर ‘सिलिंग’- गिरीश बापट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

नागपूर - राज्यात तूरडाळ १२० रुपये प्रतिकिलो दरात राज्यात उपलब्ध होईल. तूरडाळीच्या कमाल किमतीवर सिलिंग लावण्यात आल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नागपूर - राज्यात तूरडाळ १२० रुपये प्रतिकिलो दरात राज्यात उपलब्ध होईल. तूरडाळीच्या कमाल किमतीवर सिलिंग लावण्यात आल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गिरीश बापट यांनी नागपूर विभागातील तूरडाळीच्या पुरवठ्याचा आढावा घेतला. त्यांनी नागपुरात व्यापाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर ते म्हणाले, राज्यात तूरडाळीच्या पुरवठ्यापेक्षा मागणी अधिक असल्याने नेहमीच तुटवडा राहतो. यासाठी केंद्र सरकारने वाढीव पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या राज्याला ७५० मेट्रिक टन तूरडाळ मिळाली असून, अजून २ हजार मेट्रिक टन डाळ उपलब्ध होणार आहे. राज्यात तूरडाळ विक्रीच्या किमतीवर सिलिंग लावण्यात आली आहे. राज्यात १२० रुपये प्रतिकिलो दरापेक्षा अधिक दराने कोणत्याही दुकानदाराला तूरडाळ विकता येणार नाही. राज्य सरकारचा प्रयत्न त्यापेक्षा कमी दराने तूरडाळ उपलब्ध करून देण्याचा राहणार आहे. त्यापेक्षा अधिक दराने तूरडाळ विकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी
राज्यात तूरडाळीचा पेरा वाढविण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलल्याचे सांगून ते म्हणाले, शेतकऱ्यांना तूरडाळ पेरा करण्यासाठी प्रोत्साहन निधी दिला जाणार आहे. विदर्भ, मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने तूरडाळीचे उत्पादन घेतले जाते. राज्याच्या मागणीपेक्षा राज्यात डाळीचे उत्पादन बरेच कमी आहे. ही तूट भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना हा प्रोत्साहन निधी  दिला जाणार आहे. यात बी-बियाणे व खते कमी किमतीत उपलब्ध करून दिल्या जाईल, असेही  ते म्हणाले. अंत्योदय व दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांना स्वस्त धान्य दुकानांमधून तूर व चणा डाळ उपलब्ध करून दिली जाईल.

Web Title: Dal prices' silinga Girish Bapat