इव्हीएम विरूद्ध पराभूतांचा एल्गार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

अकाेला - महापालिका निवडणुकीत मतदान व मतमाेजणीत घाेटाळा झाल्याचा आराेप करीत पराभूत उमेदवारांच्या ईव्हीएम विरूद्ध संघर्ष समितीने मंगळवारी (ता. २८) इलेक्ट्रॉनिक व्हाेटींग मशिनची (ईव्हीएम) प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली. प्रेतयात्रेत भाजपा वगळता सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी सहभाग घेतला. 

अकाेला - महापालिका निवडणुकीत मतदान व मतमाेजणीत घाेटाळा झाल्याचा आराेप करीत पराभूत उमेदवारांच्या ईव्हीएम विरूद्ध संघर्ष समितीने मंगळवारी (ता. २८) इलेक्ट्रॉनिक व्हाेटींग मशिनची (ईव्हीएम) प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली. प्रेतयात्रेत भाजपा वगळता सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी सहभाग घेतला. 

अकाेला महापालिका निवडणुकीत भाजपने ८० पैकी ४८ जागा मिळविल्याने इव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्हाेटींग मशिन) मध्ये घाेळ झाल्याचा अाराेप पराभूत उमेदवार आणि काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस, भारिप-बमंस, मनसे, शिवसेनेच्या नेत्यांनी मंगळवारी दुपारी अशाेक वाटीका चाैकातून माेर्चा काढण्यात आला. मध्यवर्ती बस स्थानक, पंचायत समिती कार्यालयाच्या मार्गाने माेर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पाेहचला. माेर्चेकरांनी ‘ईव्हीएम’व्दारे मतमोजणीचा निषेध करीत ‘ईव्हीएम हटाव, लोकशाही बचाव, निवडणूक रद्द करुन मतपत्रिकांव्दारे मतदान घ्या, मतदानाचा अधिकार जतन करा हुकूमशाही बंद करा’ अशा घोषणा देत प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली. माेर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर ‘ईव्हीएम’ विरोधी संघर्ष कृती समितीच्या एका शिष्टमंडळामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांना सादर केले. त्यामध्ये महापालिका निवडणुकीत सार्वत्रित निवडणुकीमध्ये इव्हीएम साेबत पेपर ट्रेल मशीन वापरल्या गेली असल्याचा आराेप लावण्यात आला, निवडणुकीच्या दिवशी भाजपच्या उमेदवाराच्या घरी इव्हीएम मशीन मिळाल्यानंतर सुद्धा याप्रकरणी प्रशासनाने कुठलीही कार्यवाही प्रशाननाने केली नसल्याचा आराेप लावण्यात आला. त्याचप्रमाणे मतमाेजणी करतांना इव्हीएममधील डिसप्ले वरील आकडे अस्पष्ट व संदिग्ध स्वरुपाचे हाेते व मतदान माेजणी अधिकारी उमेदवारांच्या प्रतिनिधीला मत माेजणीच्या वेळी विश्वासात न घेता आकडेवारी घाेषित करून नाेंद करत हाेते त्यामुळे मतदान पारदर्शन झाले असे म्हणता येत नाही असा आक्षेप घेण्यात आला. यासर्व गाेष्टींचा विचार करता अकाेला महापालिकेची सार्वत्रिक निवडणुकीचा घाेषित केलेला निकाल रद्द करुन छापील मतपत्रिकेच्या द्वारे पूर्ण निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा इव्हीएम विराेधी संघर्ष समितीच्यावतीने महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदाेलन करण्यात येईल, असा ईशारा देण्यात आला. प्रतिकात्मक प्रेतयात्रेत काँग्रेसचे शहर अध्यक्ष बबनराव चौधरी, भारिप-बमसंचे गजानन गवई, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजय तापडिया, शिवसेनेचे तरुण बगेरे, स्वाती देशमुख, महेश गणगणे, रफीक सिद्दिकी, कपिल रावदेव, पंकज साबळे, दादाराव मते पाटील, राजेंद्र इंगोले, रामा तायडे, प्रतिभा अवचार, प्रशांत भारसाकळ, वंदना वासनिक, मनिष मोहोड, अरुंधती शिरसाट, मंगला घाटोळे, जीवन डिगे, विकास सदांशिव, मुकीम अहमद, सोमनाथ अडगावकर, बाळासाहेब इंगळे यांच्यासह राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पराभूत उमेदवार आणि अपक्ष पराभूत उमेदवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी माेर्चेकरांनी साेबत आणलेल्या प्रतिकात्मक इव्हीएम पाेलिसांनी जप्त केल्या.

Web Title: Defeat candidate against EVM