शहराध्यक्ष, विरोधी पक्षनेता बदला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाची प्रदेशाध्यक्षाकडे मागणी
नागपूर - नागपूर शहर कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष विकास ठाकरे व महापालिकेतील विरोधी पक्षनेता संजय महाकाळकर यांना हटवून नव्या व्यक्तींची निवड करावी, अशी मागणी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे केल्याचे समजते.

काही नगरसेवक व नेत्यांचे शिष्टमंडळ दिल्लीला गेले आहे.

शिष्टमंडळाने कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची सोमवारी भेट घेतली. प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांची मंगळवारी (ता. 11) भेट घेतली. या वेळी माजी खासदार गेव्ह आवारी, माजी आमदार अशोक धवड यांच्यासह ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील, नगरसेवक तानाजी वनवे, नगरसेवक संदीप सहारे, नगरसेवक बंटी शेळके आदी होते.

नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवारांची निवड योग्य न झाल्याने कॉंग्रेसला फटका बसल्याचे शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले. सामंजस्याची भूमिका न घेता नागपूर शहर कॉंग्रेस समितीचा एककल्ली कारभार झाल्याने कॉंग्रेसला फटका बसला आहे. गटातटाच्या राजकारणामुळे कोणत्याही गटाशी न जुळलेल्या व पक्षाचे काम प्रामाणिकपणे करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली. पक्षाचे काम प्रामाणिकपणे करणाऱ्या कार्यकर्त्यांवर यापुढे अन्याय होणार नाही, असे आश्‍वासन चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिले.