डेंगीत नागपूर जिल्हा ‘टॉप’

Dengue
Dengue

नागपूर - स्क्रब टायफसचा प्रादुर्भाव वाढत असताना नागपूर जिल्ह्याला डेंगीचा चांगलाच डंख बसला आहे. स्क्रब टायफसप्रमाणेच डेंगीच्या रुग्णसंख्येतही जिल्हा टॉपवर आहे. नागपूर ग्रामीणमध्ये ७२ तर शहरात ८० पेक्षा अधिक डेंगीग्रस्तांची नोंद झाली आहे. 

पूर्व विदर्भात सहा जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक दीडशे डेंगीग्रस्त नागपूर जिल्ह्यात आढळून आले आहेत. नागपूर महापालिकेच्या हद्दीत सर्वाधिक डेंगीग्रस्त आढळल्यानंतरही महापालिकेचा आरोग्य विभाग मात्र सुस्त आहे. 

डास निर्मूलनाची कोणतीही मोहीम महापालिकेने हाती घेतलेली नसून केवळ देखावा केला जात आहे. डेंगीवर कोणतेही ॲण्टिबायोटिक किंवा ॲण्टिव्हायरल औषधोपचार उपलब्ध नाही.  डेंगी झाल्यास मृत्यूचा धोका ६० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे. शहरात साडेसात हजारावर घरांमध्ये डेंगीच्या अळ्या मनपाच्या सर्वेक्षणात आढळल्यानंतरही केवळ कारवाईचा देखावा केला जात आहे.

पूर्व विदर्भात ३१५ डेंगीग्रस्त
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नोंदीत नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या ४ जिल्ह्यांत जानेवारी ते ऑगस्ट अशा ९ महिन्यांत ३१५ डेंगीग्रस्तांची नोंद झाली आहे. विशेष असे की, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात एकही डेंगीग्रस्त नसल्याचे दिसून आले. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात डेंगीचा प्रार्दुभाव वाढला आहे. 

लक्षणे
 अचानक थंडी वाजून येऊन प्रखर ताप 
 डोके, हातापायात प्रचंड वेदना 
 अशक्तपणा, भूक न लागणे, जीव मळमळणे. 
 कोणत्याच पदार्थाची चव न येणे.
 गळा दुखणे तसेच गळ्यात काटा टोचल्यासारखे वाटते. 
 सर्वांगावर लाल सुरकुत्या पडून प्रचंड वेदना

उपाय
 पॅरासिटामॉलची एक टॅबलेट्‌स दुधासोबत घेऊन ताप नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करावा.
 रुग्णास तत्काळ रुग्णालयात हलवावे. 
 डेंगी रुग्णास डिस्प्रीन, एस्प्रीन देऊ नये. 
 जर ताप १०२ डिग्रीवर अथवा त्यावर गेला असेल तर त्याला कमी करण्यासाठी हाइड्रोथेरेपी (जल चिकित्सा) करावी. 
 रुग्णास हलका आहार द्यावा.  भरपूर पाणी पाजावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com