जानकर, महात्मे यांना दाखविला परतीचा मार्ग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

नागपूर - धनगर समाजाच्या मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारण्यासह चर्चेसाठी पशू, दुग्ध व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर हे आमदार विनायक मेटे यांच्यासह मॉरेस कॉलेज टी पॉइंटवर पोचले. परंतु, समाजातील नागरिकांनी त्यांना सोमवारी परतीचा मार्ग दाखविला. यापूर्वी धनगर मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या खासदार डॉ. विकास महात्मे यांनाही परत जाण्याची विनंती केली.

धनगरांच्या आरक्षणासाठी दोन्ही नेत्यांनी राजकारण केले. स्वत:चे भले करून घेतले. आता आरक्षणावरून दोन्ही नेत्यांनी घूमजाव केल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. "काठी नि घोंगडं घेऊ द्या की रं, आम्हाला आरक्षण देऊन द्या की रं..., अशी हाक देत धनगर समाजाच्या मोर्चाने आज विधान भवनावर धडक दिली. घटनेने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी समस्त धनगर समाजातर्फे आयोजित मोर्चात हजारो धनगर नागरिक हातात पिवळे झेंडे घेऊन सहभागी झाले होते. "येळकोट येळकोट जय मल्हार', "आरक्षण मिळालेच पाहिजे', "उठ धनगरा जागा हो, आरक्षणाचा धागा हो', "पुरे झाले प्रलोभन, आता हवे आरक्षण' अशा घोषणा देत मोर्चेकऱ्यांनी विधान भवनाच्या दिशेने आगेकूच केली. मॉरेस कॉलेज टी पॉइंटवर मोर्चा अडविण्यात आला. अन्य कुणाशीही चर्चा करणार नाही, मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी यावे, असे फर्मान मोर्चेकऱ्यांनी सोडले. धनगर समाजाला दिलेले आरक्षणाचे आश्‍वासन न पाळल्याबद्दल या वेळी मुख्यमंत्र्यांचा निषेध करण्यात आला. मोर्चातील महिला, युवतींची संख्या लक्षवेधी ठरली.

विदर्भ

काँग्रेस भवनात गर्दी - मनपा निवडणुकीनंतर प्रथमच एका मंचावर नागपूर - महापालिका निवडणुकीतील पराभवाचे एकमेकांवर खापर...

10.12 AM

कर्जबाजारीपणासह विविध कारणांमुळे ओढवली परिस्थिती नागपूर - शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे पोळा. ज्याच्या मदतीने...

10.12 AM

नागपूर - विदर्भासह धान उत्पादक क्षेत्रामध्ये पावसाने दडी मारल्याने उत्पादन प्रभावित झाले आहे. यामुळे गेल्या पंधरा दिवसांत...

10.12 AM