शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा अभाव; कॉटेज हॉस्पिटलची मागणी

जितेंद्र मेखे 
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

रुग्णालय कॉटेज हॉस्पिटल करण्याची मागणी 

शिंदखेडा (धुळे) : येथील ग्रामीण रुग्णालयात विविध सुविधांचा अभाव असून सदर रुग्णालय हे कॉटेज हॉस्पिटल होण्याची मागणी आदिवासी एकता परिषद, भिल्ल विकास मंच व शिंदखेडा शहर विकास संघर्ष समितीमार्फत करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार रोहिदास वारुडे यांनी देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, ग्रामीण रुग्णालयात ओ.पी.डी.नंतर एकही डॉक्टर थांबत नाही दुपारनंतर संपूर्ण ग्रामीण रुग्णालयाची जवाबदारी एकट्या नर्सवर अवलंबून असते. एखादी मोठा अपघात घडल्यास किंव्हा सिरीयस पेशंट आल्यास ऐनवेळी एकट्या नर्सला निर्णय घेता येत नाही. किंवा उपचाराबाबत ठोस पावले उचलता येत नाही. ट्रान्सपर मेमोवर सहीसाठी सुध्दा डॉक्टर वेळेवर मिळत नाही. परिणामी पेशंट ट्रान्सपर होण्यास वेळ लागतो. त्यामुळे काही पेशंट रस्त्यावरच मरण पावतात.

तालुक्यातील नागरिक हे शेती व शेतमजुरीवर आपला उदरनिर्वाह करत असतात रुग्णालयात डॉक्टर नसल्याने परिणामी खाजगी डॉक्टरकडे जाऊन भुर्दंड सहन करावा लागतो यात शेतकरी शेतमजुरांची मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते.

खालील मागण्यांनी रुग्णालयाच्या उणीवा भरून निघाव्या रुग्णालयास लवकरात लवकर कॉटेज हॉस्पिटलचा दर्जा मिळावा सदर मागण्या तत्काळ पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. सदर मागणीचे निवेदन देतेवेळी आदिवासी एकता परिषदेचे जिल्हा सचिव दीपक आहिरे, राजेश मालचे, चंदू सोनवणे, गणेश सोनवणे, मनसाराम मालचे, सुनील सोनवणे, सागर चित्ते आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते 

मागण्या

  • शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी डॉक्टर असणे बंधनकारक असावे
  • स्त्रियांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ आठवड्यातून किमान दोन दिवस उपलब्ध असावा  
  • बालरोग तज्ञ आठवड्यातून तीन दिवस असावा 
  • रुग्णालयात संतती ऑपरेशन सुरू करावे, 
  • एक्सरे मशीन तत्काळ बसविण्यात यावे , 
  • साफसफाई कर्मचारी व पुरेसा औषध साठा असावा , 
  • प्रत्येक तज्ञ डॉक्टरचा दिवस व वार ठरवून तशी माहिती बोर्डवर असावी 

विदर्भ

नागपूर - केंद्र सरकारने तूर, उडीद आणि मूग डाळींवरील निर्यातबंदी उठवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या डाळीसह कडधान्यांच्या भावात दोनशे ते...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

नागपूर - वाढत्या तापमानामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव कमी होईल, असे चित्र होते.  परंतु, बदलत्या वातावरणातही स्वाइन फ्लूचा...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

नागपूर - मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची पदव्युत्तर शैक्षणिक व संशोधन संस्थेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असून,...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017