शिक्षकांच्या बदलीसाठी गुगल मॅप वरील अंतर अनधिकृत

अतुल नवघरे
मंगळवार, 31 जुलै 2018

अकोला (लाखपुरी) : गुगल नकाशावरील अंतर अधिकृत नसतांना देखील बदली झालेल्या शिक्षकांच्या कागदपत्र पडताळणी सुनावणीच्या वेळेस गुगल मॅप वरील अंतर गृहीत धरण्यात आल्याने जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या पती पत्नी एकत्रीकरण संवर्ग 2 चा लाभ घेतलेल्या शिक्षकांना वेतनवाढ रोखनाच्या संदर्भात कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याने शिक्षक संभ्रमात पडले आहेत.

गुगल मॅप ही सुविधा पुरविणारी गूगल कंपनी आपल्या नियम व अटी मध्ये स्पष्टपणे असे नमूद करते की गुगल मॅप वरील माहिती व प्रत्यक्ष माहिती यामध्ये तफावत असू शकते असे असताना देखील सुनावणीच्या वेळेस प्रत्यक्ष अंतरासाठी सादर केलेल्या शासकीय व निमशासकीय अधिकृत प्रमानपत्रांना अवैध ठरविण्यात आले.वास्तविक शासनाच्या ग्रामविकास विभागाने 28 जून 2018 रोजी परिपत्रक काढून बदली साठी सादर केलेल्या प्रमाणपत्रांची सत्यता पडताळून पाहण्याचे सुस्पष्ट केलेले आहे त्यामध्ये गुगल मॅप च्या वापरासंबंधी कोणताही उल्लेख नाही.

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ज्या ग्रामविकास विभागाच्या 27 फेब्रुवारी 2017 च्या शासन निर्णयानुसार झाल्या त्या शासन निर्णयामध्ये सुद्धा कुठेही अंतरासाठी गुगल मॅप  चा वापर करण्याचा  उल्लेख नाही तसेच संवर्ग 2 अंतर्गत बदली अर्ज भरण्याची मुदतीच्या शेवटच्या तारखेपर्यत शासनाचे गुगल मॅप च्या संदर्भात परिपत्रक  नसतांना देखील  गैरशासकीय गुगल मॅप चा अट्टाहास जि प शिक्षण विभाग करत आहे हे न समजणारे कोडे बनले आहे व यामुळे बऱ्याच शिक्षकांवर अन्यायपूर्ण नोटीसीची संक्रांत आली आहे

Web Title: distance on google map is valid for teachers transfer