सावधान, जिल्ह्यातील तापमान वाढतेय 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मार्च 2017

भंडारा - तलाव, नद्या, बोड्या व जंगल यामुळे समृद्ध असलेल्या जिल्ह्याचे तापमान काही वर्षांपासून सातत्याने वाढत चालले आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व वाहनांचे प्रदूषण नाही. तरीही येथील नागरिकांना वाढत्या तापमानामुळे उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहेत. ग्लोबल वॉर्मिंगबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी संपूर्ण जगात अर्थ अवर डे साजरा केला जातो. या दिवशी कमीत कमी विजेचा वापर करण्यात यावा, हाच त्यामागील उद्देश असतो. शनिवारी 25 मार्च रोजी अर्थ अवर पाळण्यात येत आहे. तासभर का होईना, अनावश्‍यक दिवे बंद ठेवून वीज बचतीचा संदेश दिला जाणार आहे. 

तापमानातील बदलासाठी आपण स्वत:ही बऱ्याच अंशी कारणीभूत असतो. या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. तरीही अनेक भागांत शेतकऱ्यांनी उन्हाळी धानपीक घेतले आहे. चौरास भागात पाण्याचा अतिउपसा झाल्याने जलस्तर घटला. त्यामुळे शेतकरी भर उन्हाळ्यात कृषिपंपासाठी 24 तास वीजपुरवठा करण्याची मागणी करीत आहेत. प्रत्येक नागरिकाने आपल्या सवयींत बदल करून वीज वाचविण्यात हातभार लावण्याची गरज आहे. वीज, पाणी, ऊर्जा यांचा अतिरेकी वापर केला जातो. त्याचे विपरीत परिणाम एकंदरीत सर्वांनाच सोसावे लागतात. 

विजेची बचत व्हावी, यासाठी अर्थ अवर साजरा करण्यामागचा हेतू आहे. परंतु, यात वीज वितरण करण्याची जबाबदारी असणाऱ्या महावितरण विभागानेही याचे भान ठेवण्याची गरज आहे. विजेची चोरी, वीजगळती होण्याचे प्रमाणही अधिक आहे.