चंद्रपूर : गोंडपिपरीच्या भुमीपुत्राचा अमेरिकेत डंका

Sudarshan Kurwadkar
Sudarshan Kurwadkar

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : भारतीयांच्या बुध्दीमतेला जगात तोड नाही. विदेशातही आपले तरूण कर्तृत्वाने देशाचा बहुमान वाढवित आहेत.अमेरिकेतील कॅलीफोर्नीया विद्यापीठातील सहयोगी प्रोफेसर व गोंडपिपरीचे भुमीपुत्र डाॅ. सुदर्शन कुरवडकर यांनी तयार केलेल्या प्रकल्पाला अमेरिकन सरकारने पुरस्कार देऊन गौरव केला आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना तब्बल 1.5 मीलीयन डाॅलर (दहा कोटी रूपये) देण्यात आले आहेत.

अमेरिकेच्या कॅलीफोर्नीया विद्यापीठात अमेरिकसह देशविदेशातील हजारो तरूण शिक्षण घेतात.मुळचे चंद्रपूर जिल्हयातील गोंडपिपरी येथील सुदर्शन कुरवडकर हे गेल्या अनेक वर्षापासून या विद्यापीठात सहयोगी प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत.पर्यावरण व अभियांत्रीकी या विषयात त्यांचा हातखंडा आहे.कॅलीफोर्नीया विद्यापीठात अमेरिकन विद्याथ्र्यांसह जवळपास चाळीस हजार स्पॅनीश विद्यार्थी शिक्षण घेतात.संगणक विज्ञान व अभियांत्रीकीत हे विद्यार्थी इतर विद्याथ्र्यांच्या तुलनेत मागे असल्याचे डाॅ.सुदर्शन कुरवडकर यांच्या लक्षात आले.यामुळे हा वर्ग मुख्य प्रवाहात यावा यासाठी डाॅ.कुरवडकर यांनी एक प्रकल्प तयार केला.यातून त्यांनी स्पॅनीश विद्यार्थ्यांची कैफियत मांडली.सोबत त्यांच्या विकासासाठीच्या विस्तृत उपाययोजना सांगितली.अमेरिकन सरकारच्या राष्ट्रीय विज्ञान संस्थेने या प्रकल्पाची दखल घेतली.यानंतर डाॅ.सुदर्शन कुरवडकर यांना अमेरिकन सरकारकडून तब्बल 1.5 मिलीयन डाॅलर दहा कोटी रूपये देण्यात आले आहेत.या रकमेचा वाफर कॅलीफोर्नीया विद्यापीठातील स्पॅनीश विद्याथ्र्याच्या विकासासाठी करण्यात येणार आहे.

विज्ञान, गणित, अभियांत्रीकी, तंत्रज्ञान या विषयांत त्यांच्या विकासाला घेत दहा कोटी रूपयाचा निधी डाॅ.सुदर्शन कुरवडकर यांना सुपुर्द करण्यात आला आहे.या निधीचा सदुपयोग करण्याचा अधिकारही त्यांनाच सुपुर्द करण्यात आला आहे. कॅलीफोर्नीया विद्यापीठातील विद्याथ्र्यांच्या विकासासाठी एका भारतीयांच्या प्रकल्पाला निवडीत दहा कोटीचा निधी देण्यात आल्याने हा देशाचा गौरव असल्याचे मानल्या जात आहे.

खासदारांकडून कौतूक........
डाॅ.सुदर्शन कुरवडकरांच्या या कामगीरीने अमेरिकेतील खासदारांनी त्यंाच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.त्यांच्या अमेरिकेतील घरी अनेक खासदारांनी भेट देत त्यांचे अभिनंदन केले आहे.

डाॅ. कुरवडकर कोण आहेत......
डाॅ. सुदर्शन कुरवडकर हे चंद्रपूर जिल्हातील गोंडपिपरी येथील मुळचे रहिवासी आहेत.गेल्या अनेक वर्षापासून ते कॅलीफोर्नीया स्टेट आॅफ अमेरिका येथे सहयोगी प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत.विज्ञान आणी पर्यावरण हा त्यांचा विषय आहे.जगातील प्रदुषण निर्मुलनासाठी त्यांचे विशेष अध्ययन सुरू आहेत. मागील वर्षी भारत सरकारच्या विनंतीवरून आयआयटी खरगपूर येथील विद्यार्थ्यांना त्यांनी अध्ययनाचे धडे दिले होते.

मी तयार केलेल्या प्रकल्पाला अमेरिकन सरकारने मंजुरी दिली आहे सोबतच दहा कोटी रुपयाचा पुरस्कार देखील देण्यात आला आहे.हि रक्कम क्यालिफोर्निया स्टेट आफ अमेरिका  विध्यापिठातील गणितीय,तंत्रद्यान,विध्यान,अभियांत्रिकी पदवी शिक्षणात सुधारणा करण्यासाठी वाफरण्यात येईल.
- डॉ. सुदर्शन कुरवडकर, सहयोगी प्रोफेसर, कॅलिफोर्निया स्टेट ऑफ अमेरिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com