स्वप्नांना लाभले मदतीचे पंख

स्वप्नांना लाभले मदतीचे पंख

नाव प्रीतम अरविंद मानेराव. बीएस्सी पास झाला. उराशी उंच भरारी घेण्याचे स्वप्न. नागपूरच्या बगडगंज येथे राहणाऱ्या प्रीतमच्या घरात अठराविश्‍वे दारिद्रय. वडील सफाई कामगार. गरिबीतही शिक्षणाची जिद्द आणि चिकाटीमुळे प्रीतमने शिक्षण सोडले नाही. बारावीत चांगले गुण असतानाही त्याने बीएस्सी पदवी संपादन देली. एमएस्सी कॉम्प्युटर करण्याचे ध्येय ठरवले. युनिव्हर्सिटी ऑफ डबलिनमध्ये एमएस्सी अभ्यासक्रमासाठी अर्ज केला. अर्ज मंजूर झाला. ऑनलाइन प्रवेश परीक्षा दिली. परीक्षेत उत्तम गुणांनी पास झाला. मात्र, गरिबीमुळे प्रीतमचे स्वप्न पूर्ण होणे कठीण होते.

अल्प वेतनात दोन वेळचे अन्न कसेबसे मिळत होते. वर्षभराच्या अभ्यासक्रमाला पाच लाखांवर खर्च आणायचा कुठून हा प्रश्‍न होता. सामाजिक न्याय विभागत प्रीतमने अर्ज केला. ‘बार्टी’च्या माध्यमातून त्याची परीक्षा घेतली गेली. त्यातही तो अव्वल आला. कागदांची जुळवाजुळव केली गेली आणि सामाजिक न्याय विभागामार्फत परदेशी शिक्षणासाठी प्रीतमला मदत मिळाली. प्रीतम सध्या परदेशात शिक्षण घेत आहे. 

वाडीसारख्या ग्रामीण भागात राहणारा सुनील राजहंस मेश्राम. गरिबीचे जीवन जगतानाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी भारावल्यामुळे उच्च शिक्षणाचा ध्यास उराशी बाळगला होता. स्वतःचे शिक्षण करण्यासाठी त्याने चार वर्षांपासून शिकवणी वर्ग घेणे सुरू केले. पैसे गोळा करून शिकू लागला. पदवी संपादन केली. अकाउंट ॲण्ड फायनन्सच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ऑस्ट्रेलियातील ॲडलेड विद्यापीठाची परीक्षा दिली. प्रवेश परीश्रा उत्तीर्ण झाला. जागतिक क्रमवारीत तो ११३ क्रमांकावर आला. त्याच्याकडेही शिक्षणासाठी पैस नव्हते. अखेर सामाजिक न्याय विभागाकडे अर्ज केला. ‘बार्टी’ने खेड्यात राहणाऱ्या सुनीलमधील आत्मविश्‍वास ओळखला. त्याला न्याय देत समाजकल्याण विभागाने त्याच्या शिक्षणाचा भार उचलला. दोन वर्षे सामाजिक न्याय विभाग त्याचा सर्व खर्च पेलणार आहे. अशी एक नव्हे तर सामाजिक न्याय विभागाअंतर्गत यावर्षी नागपुरातील ९ विद्यार्थ्यांना लाभ मिळाला आहे. तर, आगामी तीन वर्षांत किमान २५ गरीब मुलांना परदेशी शिक्षणाची संधी मिळेल. 

दिव्यांगांना सामाजिक न्याय   
महाराष्ट्र अपंग वित्त महामंडळामार्फत विदर्भातील बुलडाणा, अकोला, चंद्रपूर, अमरावती,  वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांतील २ हजार २७५  दिव्यांग बांधवांना कर्ज देऊन त्यांचा व्यवसाय फुलवला. सोबतच सिद्धार्थनगर टेका  येथील पंखुडी लक्ष्मण वंजारी या दिव्यांग मुलीला साडेआठ लाख रुपयांचे शैक्षणिक कर्ज  उपलब्ध करून दिल्यामुळे ही मुलगी अमेरिकेत दोन वर्षे शिक्षण घेण्यास पात्र ठरली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com