घराघरांत तुंबणार सांडपाणी

Dranage-Line
Dranage-Line

नागपूर - शहरात अनेक ठिकाणी सिमेंट रस्त्यांचे काम सुरू आहे. मात्र या रस्त्यांच्या बाजूला पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी अद्यापही ड्रेनेज लाइन नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी पावसाच्या पाण्याचा ताण जुन्या ६०-६५ वर्षे जीर्ण सिवेज लाइनवर येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. त्यामुळे नागपूरकरांच्या घरांत सांडपाणी तुंबून आरोग्याची नवी समस्या उभी राहण्याचीही शक्‍यता बळावली आहे. 

शहरात सिमेंट रस्त्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. मात्र, लोकसंख्या ३० लाखांवर वाढूनही शहरात आजही जुन्या जीर्ण सिवेज लाइनमधून सांडपाणी वाहत आहे. सिमेंट रस्त्यांच्या बाजूने ड्रेनेज लाइन तयार न केल्याने या जीर्ण सिवेज लाईनवर यंदाच्या पावसाळ्यात मोठा ताण पडणार आहे.

सिमेंट रस्ते तयार करताना सर्वप्रथम ड्रेनेज लाईन तयार करण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली. रिंग रोडच्या कामात ही बाब दिसून येते. मात्र, शहरातील सिमेंट रस्त्याच्या कंत्राटदारांचा याबाबत हलगर्जीपणा दिसत असून नागपूरकरांना यंदा परिणाम भोगावे लागतील, असे चित्र आहे. पंचशील चौक ते धंतोली पोलिस स्टेशनपर्यंतचा रस्ता निम्मा तयार झाला. मात्र, रस्त्याच्या कडेला ड्रेनेज लाइन नाही. हीच बाब सेंट्रल बाजार रोड, रामेश्‍वरी रोड येथेही दिसून येते. त्यामुळे रस्त्यावरील पावसाचे पाणी घरात शिरणे, नागरिकांकडून ते पाणी सिवेज लाइनद्वारे बाहेर काढण्याचा प्रयत्न होईल. एकाचवेळी सांडपाणी आणि पावसाळी पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता सिवेज लाईनमध्ये नसल्याने अनेकांच्या घरांतच हे पाणी तुंबण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

सिवेज लाइन 1670 किमी
व्यास 100-1800 मिलिमीटर

सावधान
रामदासपेठ
धंतोली
बर्डी 
महाल
इतवारी
मस्कासाथ 
जागनाथ बुधवारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com