पूर्व झाला भाजपचा बालेकिल्ला 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

नागपूर - एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पूर्व नागपूर विधानसभा मतदारासंघाने सर्वाधिक 22 नगरसेवक भाजपला दिलेत. येथून फक्त पाच उमेदवारांचा पराभव झाला. विशेष म्हणजे तिकीट वाटपानंतर सर्वाधिक रोष याच मतदारसंघात खदखदत होता. मात्र, आमदार कृष्णा खोपडे यांनी सर्वाधिक नगरसेवक निवडून आणून पुन्हा आपले नेतृत्वसिद्ध केले. 

नागपूर - एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पूर्व नागपूर विधानसभा मतदारासंघाने सर्वाधिक 22 नगरसेवक भाजपला दिलेत. येथून फक्त पाच उमेदवारांचा पराभव झाला. विशेष म्हणजे तिकीट वाटपानंतर सर्वाधिक रोष याच मतदारसंघात खदखदत होता. मात्र, आमदार कृष्णा खोपडे यांनी सर्वाधिक नगरसेवक निवडून आणून पुन्हा आपले नेतृत्वसिद्ध केले. 

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा महापालिकेच्या निवडणुकीत पूर्वमधून तब्बल एक लाख 24 हजार 156 मते अधिक मिळाली आहेत. येथील सर्व नगरसेवकांचा वाड्यावर नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांचे अभिनंदनही करण्यात आले. पूर्व नागपूर मतदारसंघात समावेश असलेल्या मध्य, दक्षिणेतील पाच नगरसेवक निवडून आले आहेत. एकेकाळी पूर्व नागपूर कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी सलग तीनवेळा आले होते. कृष्णा खोपडे यांनीच त्यांच्या वर्चस्वाला सर्वप्रथम धक्का दिला. यानंतर जातीय समीकरण बघून कॉंग्रेसने ऍड. अभिजित वंजारी यांना पाठविले. त्यांनाही खोपडे यांनी चीत केले. आता हा मतदारसंघ वंजारी यांचा ही चतुर्वेदी याबाबत कॉंग्रेसमध्ये भांडणे सुरू झाली आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत ती बघायलासुद्धा मिळाली. याचाही फायदा भाजपला झाला. 

लाल दिवा केव्हा? 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विधानसभेच्या प्रचारात कृष्णा खोपडे यांना निवडून द्या, त्यांना लाल दिवा देतो, असे आश्‍वासन जाहीरसभेत दिले होते. आज सुमारे दोन वर्षांचा कार्यकाळ उटलून गेला. खोपडे यांच्या गाडीला लाल दिवा लागलेला नाही. खोपडे यांना लाल दिवा मिळेल की नाही, याचे उत्तर देणे सध्या कठीण असले तरी भाजपला भरभरून यश मिळवून देणाऱ्या पूर्वला यंदा महापौर किंवा स्थायी समिती अध्यक्ष मिळण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

विदर्भ

दुपारी पावणेदोनपर्यंत प्रतिष्ठापनेचा मुहूर्त शेगाव (बुलढाणा): यावर्षी श्री गणेशोत्सव 12 दिवसांचा राहणार आहे. त्यामूळे...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017

धंतोली झोनने हटविली दुकाने - मांस, चिकन जप्त नागपूर - पोळ्याच्या पाडव्याची संधी साधत अनेकांनी आज रस्त्यांच्या बाजूलाच...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017

चौकातील हौदांवर नागरिक संतप्त - ‘सोशल मीडिया’वर काढले महानगरपालिकेचे वाभाडे नागपूर - फक्त सिमेंट रोड केले जात आहेत. सदोष...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017