अनुभवसमृद्ध शिक्षणापासून समाज दुरावला - डॉ. मोहन आगाशे

नागपूर - इंडियन अकादमी ऑफ न्यूरॉलॉजीतर्फे आयोजित 'अस्तु' चित्रपटाचे सादरीकरण झाले. यावेळी चर्चा करताना डॉ. मोहन आगाशे, सोबत महापौर नंदा जिचकार व डॉ. चंद्रशेखर मेश्राम.
नागपूर - इंडियन अकादमी ऑफ न्यूरॉलॉजीतर्फे आयोजित 'अस्तु' चित्रपटाचे सादरीकरण झाले. यावेळी चर्चा करताना डॉ. मोहन आगाशे, सोबत महापौर नंदा जिचकार व डॉ. चंद्रशेखर मेश्राम.

नागपूर - अस्तित्वात असलेली शिक्षण व्यवस्था केवळ पदवी मिळवून देणारी कारखाने बनली आहेत. पैशाने सारेच विकत घेता येते असा समज होऊन बसला आहे. परंतु, ज्ञान हे अनुभवातून येते असून अनुभव समृद्ध शिक्षणापासून समाज दूर गेल्याची खंत ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ आणि प्रख्यात अभिनेता डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केली.

जागतिक मेंदू दिनानिमित्त रविवारी ऑरेंजसिटी कल्चरल फाऊंडेशनच्याच्या सहकार्यातून इंडियन अकादमी ऑफ न्यूरॉलॉजी, नागपूर न्यूरो सोसायटी, सायकॅट्रिक सोसायटीतर्फे पर्सिस्टंटच्या कवी कुलगुरू कालिदास सभागृहात डॉ. आगाशे निर्मित विस्मरणावर आधारित ‘अस्तु’ या चित्रपटाचा खेळ दाखविण्यात आला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिक्षणातून खरे तर प्रेरणा मिळावी. कुतूहल निर्माण व्हावे. परंतु, ही शिक्षण प्रणाली कधीच मोडीत निघाली आहे. डिजिटलायझेशनमुळे प्रगत तंत्र मिळाले खरे; परंतु मनाची प्रगल्भता आम्ही हरवून बसलो आहोत, असेही डॉ. आगाशे म्हणाले. डॉ. आगाशे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सध्याच्या शिक्षण व्यवस्था मनात गुंतागुंत निर्माण करणारी असल्याचे सांगत मेंदूच्या व्याधी आणि आजचा सिनेमा या विषयांवर प्रकाश टाकला.

जगण्याचे सुरू आहे मार्केटिंग
जन्म व मृत्यू हे वेगळे नसून एकच आहे. योग्य वेळी आलेले मरणही आनंदादायी आहे. परंतु, मरण वाईटच आहे, असा समज होऊन बसला असून, सर्वत्र जगण्याचे मार्केटिंग सुरू झाले. वैद्यकक्षेत्राने प्रचंड प्रगती केली आहे. क्षयरोगाने दरवर्षी दोन लाख मृत्यू होत असून, त्यापेक्षा अधिक म्हणजे १८ लाख मृत्यू हवेतील प्रदूषणाने होतात. ही मरण सांगणारी आकडेवारी मरण वाईट आहे हेच सांगते. भुतकाळ आणि भविष्यकाळ अनावश्‍यक वाटते तेव्हा खर जगणे हे वर्तमानकाळातील असते, असेही डॉ. आगाशे म्हणाले.

सिनेमा करमणुकीपुरता
सिनेमा निव्वळ करमणुकीपुरता उरला आहे. जो सिनेमा प्रेक्षकांच्या मनात प्रश्‍न निर्माण करतो व उत्तरे शोधण्यासाठी धडपड निर्माण करतो तोच खरा सिनेमा आहे, असे डॉ. आगाशे म्हणाले. मानवी भावना समृद्ध करणारा सिनेमा दुर्मीळ झाला आहे. मोबाईलमध्ये कॅमेरा दिसतो खरा; परंतु साउंड आणि इमेज घेताना अनुभव लागतो. तो अनुभव समृद्ध व्हावा हीच इच्छा, डॉ. आगाशे यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com