आठवर्षीय बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

यवतमाळ - येथील इंदिरानगर भागात राहणाऱ्या एका आठवर्षीय चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची घटना आज, मंगळवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास उघडकीला आली. घटनेची तक्रार देण्यासाठी व आरोपीला अटक करून कठोर कारवाई करण्यासाठी शेकडोंच्या संख्येत जमाव येथील अवधूतवाडी पोलिस ठाण्यात जमला होता. त्यामुळे काहीकाळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. 

येथील इंदिरानगर भागात राहणाऱ्या आठवर्षीय बालिकेवर 25 वर्षीय तरुणाने अत्याचाराचा प्रयत्न केला. ही घटना मुलीच्या आईला माहीत होताच तिने चिमुकलीसह पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी विलंब न करता आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यावरच बाललैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हे नोंदविले जातील, अशी भूमिका पोलिसांनी घेतली. आरोपीला ताब्यात द्या, आम्ही त्याला शिक्षा करतो, असे म्हणत शेकडो नागरिकांनी पोलिस ठाण्यात गर्दी केली. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु पोलिसांनी कायदेशीर कारवाईचे आदेश देत जमावाची समजूत काढली. मुलीच्या आईने तोंडी तक्रार दाखल केली आहे. वृत्त लिहिस्तोवर लेखी तक्रार वा गुन्हा नोंदविला नव्हता. 

Web Title: eight-year-old child rape case in yavatmal