झोटिंग समितीसमोर खडसेंची चौकशी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

आतापर्यंत समितीला दोन वेळा मुदतवाढ दिली. या वेळी समितीने एमआयडीसी व संबंधित अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवून महत्त्वाचे दस्तऐवज ताब्यात घेतले. फक्त एकनाथ खडसे यांचा युक्तिवाद बाकी राहिला होता.

नागपूर : भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे मंगळवारी न्या. दिनकर झोटिंग समितीसमोर हजर झाले. त्यांनी शपथपत्र समितीकडे सादर केले असून, एमआयडीसीने तारीख मागितल्याने युक्तिवाद टळला. पुढील सुनावणी 21 फेब्रुवारीला होणार आहे.

खडसे यांनी पदाचा दुरुपयोग करून भोसरी येथील जमीन नातेवाइकास मिळवून दिल्याचा आरोप आहे. तसेच दाऊदशी संभाषण आणि लाच प्रकरणाचा ससेमिरा त्यांच्यामागे लागला होता. यामुळे त्यांना मंत्रिमंडळातून जावे लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोसरी जमिनीच्या चौकशीसाठी झोटिंग समिती नेमली. न्या. झोटिंग नागपूरचे असल्याने त्यांना रविभवन येथील कॉटेज उपलब्ध करून दिले. इतर दोन आरोपांमध्ये खडसे यांना राज्य शासनाने क्‍लीन चिट दिली असली, तरी भोसरी जमीनची चौकशी अद्याप सुरू आहे.

खडसे आज सकाळी अकराच्या सुमारास उपस्थित झाले. तब्बल 40 मिनिटे ते समितीसमोर होते. एमआयडीसीने म्हणणे मांडण्यासाठी तारीख मागितल्याने युक्तिवाद टळला. विशेष म्हणजे झोटिंग समितीची मुदत बुधवारी संपत आहे. मात्र, अंतिम चौकशी अहवाल सादर करण्यासाठी समितीने सहा आठवड्यांची मुदत मागितली आहे.

विदर्भ

काँग्रेस भवनात गर्दी - मनपा निवडणुकीनंतर प्रथमच एका मंचावर नागपूर - महापालिका निवडणुकीतील पराभवाचे एकमेकांवर खापर...

10.12 AM

कर्जबाजारीपणासह विविध कारणांमुळे ओढवली परिस्थिती नागपूर - शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे पोळा. ज्याच्या मदतीने...

10.12 AM

नागपूर - विदर्भासह धान उत्पादक क्षेत्रामध्ये पावसाने दडी मारल्याने उत्पादन प्रभावित झाले आहे. यामुळे गेल्या पंधरा दिवसांत...

10.12 AM