ग्राहकांना दारावरच भरता येईल वीजबिल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

महावितरण - स्पॉट बिलिंगच्या माध्यमातून कर्मचारी स्वीकारणार देयके
नागपूर - थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेदरम्यान तांत्रिक कर्मचारी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांना वीजबिल स्वीकारण्यास महावितरणने मंजुरी दिली. या निर्णयामुळे महावितरणच्या ग्राहकांना वीजबिल भरण्याची घरपोच सेवा प्राप्त झाली आहे. 

महावितरण - स्पॉट बिलिंगच्या माध्यमातून कर्मचारी स्वीकारणार देयके
नागपूर - थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेदरम्यान तांत्रिक कर्मचारी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांना वीजबिल स्वीकारण्यास महावितरणने मंजुरी दिली. या निर्णयामुळे महावितरणच्या ग्राहकांना वीजबिल भरण्याची घरपोच सेवा प्राप्त झाली आहे. 

थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेदरम्यान ग्राहकाला थकबाकीची संपूर्ण रक्कम रोखीने अथवा धनादेशामार्फत महावितरण कर्मचाऱ्याकडे जमा करता येईल. कर्मचारी महावितरणच्या ॲपमध्ये संबंधित ग्राहकाच्या मोबाईल क्रमांकाची आणि पैसे भरल्याची नोंद करतील. लागलीच ग्राहकाला त्याच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे पैसे भरल्याची पावती मिळेल. हे पथक ज्याही भागात असेल तेथील कोणत्याही ग्राहकाला बिलाचा भरणा त्यांच्याकडे करता येईल. महावितरण कर्मचाऱ्याला दररोज २५ हजारांपर्यंतची बिले स्वीकारण्याची परवानगी देण्यात आली आहे. या सेवेसंदर्भात सर्व उपविभागीय अभियंत्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. नागपूर परिमंडळात अनेक ठिकाणी ही सेवा सुरू झाली आहे. वीजबिलाचा भरणा करण्यात अडचणी येणाऱ्या ग्राहकांना आपले वीजबिल भरणा करणे या सेवेमुळे अधिक सुलभ होईल.

क्‍यूआर कोडचा समावेश
महावितरणने क्‍यूआर कोडचा समावेश आपल्या बिलामध्ये केला आहे. या कोडद्वारे महावितरणचे मोबाईल ॲप थेट डाउनलोड करता येते. मोबाईलधारकांनी स्मार्टफोनमध्ये असलेल्या किंवा डाउनलोड केलेल्या क्‍यूआर कोड रीडरच्या माध्यमातून वीजबिलावरील क्‍यूआर कोड स्कॅन करता येतो. त्यावरून महावितरणची मोबाईल ॲपची लिंक मिळून बिलाचा भरणा करता येतो. वीजबिलावरील क्‍यूआर कोड ॲण्ड्राइड, आयओएस, विंडोज मोबाईलसाठीही उपलब्ध आहे. ग्राहकांनी या सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

विदर्भ

नागपूर - केंद्र सरकारने तूर, उडीद आणि मूग डाळींवरील निर्यातबंदी उठवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या डाळीसह कडधान्यांच्या भावात दोनशे ते...

04.06 PM

नागपूर - वाढत्या तापमानामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव कमी होईल, असे चित्र होते.  परंतु, बदलत्या वातावरणातही स्वाइन फ्लूचा...

04.06 PM

नागपूर - मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची पदव्युत्तर शैक्षणिक व संशोधन संस्थेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असून,...

04.06 PM