सणासुदीतच दरवाढीचा ‘शॉक’

Electricity-Rate
Electricity-Rate

नागपूर - राज्यात १ सप्टेंबरपासून वीजदरवाढ लागू झाली. ऐन सणासुदीतच वीजग्राहकांना वाढीव दराचा शॉक सहन करावा लागत आहे. शंभर युनिटपर्यंत वीजवापर असणाऱ्या ग्राहकांना सध्याच्या सरासरी बिलाच्या तुलनेत १६० रुपये अधिक तर ३०० युनिट वीजवापर असणाऱ्या ग्राहकांना अडीचशे रुपयांपर्यंत अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागत आहे.

एमईआरसीच्या परवानगीनंतर महावितरणने राज्यात वीजदरवाढ लागू केली. वीजदरवाढ लागू करताना वीजदरात फारच कमी वाढ करण्यात आल्याचा दावा केला होता. परंतु, स्थिर आकारात मोठी वाढ केली आहे. शिवाय वहन आकारासह अन्य शुल्कांमध्ये वाढ केली आहे. 

यामुळे येणारे वाढीव वीजबिल वीजग्राहकांना ‘जोर का झटका धीरे से’ देणारेच ठरत आहे. आतापर्यंत स्थिर आकार सिंगल फेस ग्राहकांसाठी ६५ रुपये तर थ्री फेस ग्राहकांसाठी १८५ रुपये होता. आता सिंगल फेस ग्राहकांना ८० रुपये तर थ्री फेस ग्राहकांना सकरसकट ३०० रुपये भरावे लागणार आहेत. 

म्हणजेच थ्री फेस ग्राहकांच्या स्थिर आकार शुल्कात तब्बल ६२ टक्के वाढ केली आहे. महावितरणच्या बिल तयार करणाऱ्या यंत्रणेत नवीन दर फीड करून बिलवाटप सुरू करण्यात येत आहे. म्हणजेच प्रत्येक वीजग्राहकांना आता वीजबिलासाठी अतिरिक्त तरतूद करणे क्रमप्राप्त ठरले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com