छत्रपती चौकात वीजचोरी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

नागपूर - मेट्रो रेल्वेच्या मार्गासाठी छत्रपती चौक उड्डाणपूल पाडला जात आहे. रात्रंदिवस पूल तोडण्याचे काम सुरू असून, लावण्यात आलेल्या फ्लडलाइटसाठी विजेची चोरी केली जात असल्याचे महावितरणच्या पथकाने आज उघडकीस आणले. 

नागपूर - मेट्रो रेल्वेच्या मार्गासाठी छत्रपती चौक उड्डाणपूल पाडला जात आहे. रात्रंदिवस पूल तोडण्याचे काम सुरू असून, लावण्यात आलेल्या फ्लडलाइटसाठी विजेची चोरी केली जात असल्याचे महावितरणच्या पथकाने आज उघडकीस आणले. 

मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत छत्रपती चौकात डबलडेकर पूल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी अस्तित्वातील उड्डाणपूल तोडण्यात येत आहे. गेल्या चार दिवसांपासून दिवस रात्र तोडकाम सुरू आहे. रात्रीच्या वेळी थेट ‘फीडर पिलर’मध्ये वायर टाकून चोरीच्या विजेवर फ्लडलाइट सुरू करण्यात येत होते. तोडकामाचे कंत्राट असलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून ही वीजचोरी सुरू होती. सजग नागरिकांकडून या प्रकाराची माहिती महावितरणच्या  कार्यालयाला देण्यात आली. त्या आधारावर महावितरणचे पथक रात्री ८.३० वाजताच्या घटनास्थळी धडकले. इथे उघडपणे वीजचोरी सुरू असल्याचे आढळून आले. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. परंतु, जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने वीजचोरीच्या किमतीचे असेसमेंट होऊ शकले नाही. रविवारी वीजचोरीच्या किमतीबाबत स्पष्टता होऊ शकेल, असे महावितरणकडून सांगण्यात आले.

विदर्भ

बेलगाव/बुलडाणा - प्रस्तावित मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गातून बागायती क्षेत्र...

05.15 AM

वाशीम - सततची नापिकी, भाड्याने केलेल्या शेतीसाठी घेतलेली हातउसनी रक्कम कशी फेडावी, उपवर...

04.39 AM

नागपूर - राष्ट्रसेविका समितीच्या माजी प्रमुख संचालिका उषाताई चाटी (वय 91) यांचे...

04.12 AM