भूम दूध संघातील कर्मचाऱ्यांना वेतन देणार - जानकर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

नागपूर - उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथील दूध उत्पादक संघातील कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी थकीत रकमेची सोय दूध संघाची जमीन विकून केली जाईल, अशी माहिती पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी आज विधान परिषदेत दिली.

नागपूर - उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथील दूध उत्पादक संघातील कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी थकीत रकमेची सोय दूध संघाची जमीन विकून केली जाईल, अशी माहिती पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी आज विधान परिषदेत दिली.

सूजीतसिंह ठाकूर यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता. उत्तर देताना महादेव जानकर म्हणाले, राज्यात एकूण 70 जिल्हा दूध संघ आहेत. त्यापैकी 50 चालू असून 20 बंद आहेत. त्यासोबतच तालुकास्तरावरील दूध संघाची संख्या 28 असून, त्यातील 19 चालू तर 9 बंद आहेत. 2010 मध्ये गैरव्यवहाराच्या कारणावरून भूम तालुका दूध संघ बंद पडला. त्यानंतर येथील कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले. तब्बल 101 कोटी 89 लाख रुपयांची देणी संघाची बाकी आहेत. परंतु अवसायकाकडे इतका निधी नसल्याने पैसे देणे शक्‍य झाले नाही. दूध संघाची 1 हेक्‍टर 1 आर जमीन विकण्याचे प्रस्तावित आहे. या जमिनीची किंमत 69 लाख रुपये असून, त्यातून कर्मचाऱ्यांचे वेतन दिले जाणार आहे, असे जानकर म्हणाले.

प्रवीण पोटे यांना धरले धारेवर
नागपूर - विधान परिषदेत चुकीची माहिती देणारे सार्वजनिक बांधकाममंत्री प्रवीण पोटे यांना आज ज्येष्ठ सदस्यांनी धारेवर धरले. आम्ही तुमच्यासारखे थेट आमदार झालो नाहीत. जिल्हा परिषदेपासून राजकीय प्रवास सुरू केला. त्यामुळे उत्तरे देताना गांभीर्य दाखावा, असा सल्ला ज्येष्ठ आमदार जयंत पाटील यांनी दिला.

महाड तालुक्‍यामधील सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेसह इतरही विषयांवर जयंत पाटील यांनी प्रश्‍न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी चुकीची माहिती दिली. यामुळे जयंत पाटील संतप्त झाले. आम्ही 45 दिवसांपूर्वी प्रश्‍न देतो, त्याचे उत्तर जबाबदारीने मिळावी अशी अपेक्षा असते. तुम्ही चुकीची माहिती देत आहात, अशा शब्दांत त्यांना जयंत पाटील यांनी सुनावले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी हस्तक्षेप करून वाद सोडवला.

विदर्भ

काँग्रेस भवनात गर्दी - मनपा निवडणुकीनंतर प्रथमच एका मंचावर नागपूर - महापालिका निवडणुकीतील पराभवाचे एकमेकांवर खापर...

10.12 AM

कर्जबाजारीपणासह विविध कारणांमुळे ओढवली परिस्थिती नागपूर - शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे पोळा. ज्याच्या मदतीने...

10.12 AM

नागपूर - विदर्भासह धान उत्पादक क्षेत्रामध्ये पावसाने दडी मारल्याने उत्पादन प्रभावित झाले आहे. यामुळे गेल्या पंधरा दिवसांत...

10.12 AM