पर्यावरण क्षेत्रात रोजगाराची संधी -  कौस्तुभ चॅटर्जी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मार्च 2017

नागपूर - भविष्यात पर्यावरण क्षेत्रात रोजगाराच्या भरपूर संधी निर्माण होणार आहेत. त्याचा आपण फायदा कसा घेता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ग्रीन व्हिजिलचे कौस्तुभ चॅटर्जी यांनी केले.

नागपूर महानगरपालिका, फॉर्च्यून फाउंडेशन व इसीपीए यांच्या वतीने आयोजित असलेल्या युथ एम्पॉवेरमेंट समिटच्या अखेरच्या दिवशीच्या तिसऱ्या सत्रात ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रभूजी देशपांडे, बबलू चौधरी, लीना जोशी, अतुल ठाकरे, आनंद मांजरखेडे आदी उपस्थित होते.

 भारताने नुकताच केलेल्या पॅरिस करार या विषयावर त्यांनी प्रकाश टाकत भारताला या कराराद्वारे कसा फायदा होणार आहे, या बद्दल सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले. 

यावेळी लीना जोशी यांनी रोजगाराच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करताना जगात काहीतरी साध्य करण्यासाठी स्वप्न बघावे व बघितलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी धडपड करावी, असे आवाहन केले. स्वप्न साकार करण्यासाठी मेहनत, आत्मविश्वास, संयम, इच्छाशक्ती, जिद्द यांची आवश्‍यकता असते. हे गुण ज्यात असतील त्याचे आयुष्य हे घडत असते, असे त्यांनी सांगितले. संचालन प्रशांत कामडे यांनी केले. आभार आनंद मांजरखेडे यांनी मानले.