महाविद्यालये घेणार 50 टक्के परीक्षा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

कुलगुरूंचा "50-50' फॉर्म्युल्याला मान्यता

कुलगुरूंचा "50-50' फॉर्म्युल्याला मान्यता
नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू झाल्यानंतर विद्यापीठावरील परीक्षेचा भार कमी करण्याच्या उद्देशाने महाविद्यालयांनी 50 टक्के परीक्षा घेण्याचा "फिफ्टी-फिफ्टी' हा फॉर्म्यूला डॉ. सि. प. काणे मांडला. तब्बल अकरा महिन्यांनंतर त्यांच्या फॉर्म्युल्याला बुधवारी (ता. 28) विद्वत परिषदेने मान्यता दिली. पुढल्या वर्षापासून महाविद्यालयांना पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम, तृतीय आणि चतुर्थ सेमिस्टरच्या परीक्षा घ्याव्या लागणार आहेत.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार विद्यापीठांमध्ये पदवी अभ्यासक्रमांना सेमिस्टर पॅटर्न लागू करण्यात आले. त्यामुळे विद्यापीठांच्या परीक्षांमध्ये दुपटीने वाढ झाली. हिवाळी आणि उन्हाळी परीक्षांच्या बोझाखाली विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांच्या विकासात्मक उपक्रमांना खिळ बसल्याचे चिन्ह दिसून आले. त्यामुळे परीक्षांच्या बोझा कमी करण्यासाठी कुलगुरूंनी महाविद्यालय आणि विद्यापीठाने "फिफ्टी-फिफ्टी' परीक्षा घेण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी सादर केला. मात्र, त्यात केवळ "ऑनलाइन' शब्द असल्याने हा प्रस्ताव तत्कालीन विद्वत परिषदेने बारगळला. मात्र, या प्रस्तावाचा पाठपुरावा करीत बुधवारी त्यात सुधारणा करून नव्याने प्रस्ताव सादर करीत त्यास मान्यता देण्यात आली. द्वितीय, पाचवे आणि सहाव्या सेमिस्टरचे पेपर विद्यापीठ स्तरावर होईल. परीक्षेसाठी महाविद्यालयांना विद्यापीठाद्वारे उत्तरपत्रिका पाठविण्यात येतील. पाचव्या आणि सहाव्या सेमिस्टरमधील गुणांच्या आधारावरच विद्यार्थ्यांना पदवी देण्यात येईल. प्रात्यक्षिकातही बराच बदल करण्यात आला असून केवळ वर्षाच्या शेवटीच ते महाविद्यालयांना घ्यावे लागतील. मात्र, या निर्णयातून विधी, अभियांत्रिकी, बीएड आणि औषधनिर्माण हे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना वगळण्यात आले आहे. विशेष म्हणजे निर्णयाला प्राचार्य फोरमचा पाठिंबा असल्याची माहिती कुलगुरू डॉ. सि. प. काणे यांनी दिली.

प्र-कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली समिती
विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमात मान्य केलेल्या "फिफ्टी-फिफ्टी' फॉर्म्यूल्याला राबविण्यासाठी प्र-कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली एक "हायपावर' समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीद्वारे 31 मार्चपर्यंत अहवाल सादर करण्यात येईल. या समितीमध्ये विद्यापीठांसहीत महाविद्यालयातील प्राचार्य आणि तज्ज्ञांचाही समावेश करण्यात आला आहे.

विद्यापीठावरील परीक्षा बोझा कमी करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच कुलगुरूपद स्वीकारले होते. आज त्या निर्णयाला मान्यता मिळाली. विद्यापीठाच्या सुधारणेच्या दृष्टीने हे मोठे पाऊल आहे.
- डॉ. सिद्धार्थविनायक काणे, कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

विदर्भ

अकाेला : महापालिकेने केलेल्या मालमत्ता करवाढीच्या विरोधात भारिप-बमसंने शुक्रवारी (ता. १८) महापाैर विजय अग्रवाल यांच्यासह भाजप...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

नागपूर - धरमपेठेतील वाहनांच्या कोंडीची समस्या सोडविण्यासाठी आज गुरुवारपासून ‘नो पार्किंग झोन’ अस्तित्वात आला. आज वाहतूक पोलिसांनी...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

३० टक्‍क्‍यांपेक्षा कमी प्रवेश - ७३ हजार जागा रिक्त  नागपूर - ३० टक्‍क्‍यांपेक्षा कमी प्रवेश असलेली राज्यातील जवळपास...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017