शेतकऱ्यांना ६१४ कोटींचा मोबदला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

नागपूर - नागपूर-मुंबई या राज्य शासनाच्या प्राधान्यक्रम असलेल्या समृद्धी महामार्गासाठी आतापर्यंत ७०० हेक्‍टर जमीन संपादित करण्यात आली असून, ती एकूण जागेच्या ९० टक्के आहे. या जागेसाठी शेतकऱ्यांना ६१४ कोटी ३० लाखांचा मोबदला देण्यात आला. 

समृद्धी महामार्गासाठी नागपूर व वर्धा जिल्ह्यातील १ हजार ४३ हेक्‍टर जमिनीची आवश्‍यकता आहे. यात खासगी वाटाघाटीने ८०२.८५ हेक्‍टर जमीन खरेदी करावयाची आहे. तर १८७.६७ हेक्‍टर शासकीय जमीन आहे.

विभागातील १ हजार १६० शेतकऱ्यांची शेतकऱ्यांकडून जमीन खरेदी करावयाची असून, त्यापैकी १ हजार ६ शेतकऱ्याकडून ७००.२८ हेक्‍टर जमीन प्रत्यक्ष खरेदी करण्यात आली. जमीन खरेदीसाठी शेतकरी सभासदांना ६१४ कोटी ३० लाख ३३ हजार ८३१ रुपये अदा करण्यात आले.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी नागपूर जिल्ह्यातील २१ गावांतील २८.४२ किलोमीटर महामार्गासाठी जमिनीच्या खरेदीला सुरुवात केल्यानंतर शेतकरी सभासदांनी शासनाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी संमतीपत्र दिल्यानंतर प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात झाली. यात २७९ गट क्रमांकातील २०२.१९ हेक्‍टर आर जमिनीच्या खरेदीची प्रक्रिया सुरू झाली. त्यापैकी २४९ गट क्रमांकातील शेतकऱ्यांनी १८७.१५ हेक्‍टर आर जमीन उपलब्ध करून दिली. यासाठी शेतकऱ्यांना २४५ कोटी ९२ लाख रुपये मोबदला देण्यात आला. जिल्ह्यात सरासरी ९५.२३ टक्के शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला जमीन उपलब्ध करून दिली. तसेच ९७.५२ हेक्‍टर आर ही शासकीय जमीन असून, १५.८३ हेक्‍टर आर हे वन जमिनीचे क्षेत्र आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी जिल्ह्यातील २८४.६७ हेक्‍टर आर जमीन उपलब्ध झाली.

वर्धा जिल्ह्यातील सेलू, वर्धा आणि आर्वी या तालुक्‍यातील ३४ गावांतील ६०.७३ किलोमीटर लांबीसाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू आहे.  
यात ९०.१५ हेक्‍टर आर जमीन शासकीय तर ३४.७७ हेक्‍टर आर जमीन आहे तसेच ६००.६६ हेक्‍टर आर जमीन खरेदी करण्यात येत आहे. 

८८१ गट क्रमांकातील शेतकऱ्यांकडून खरेदीची प्रक्रिया करण्यात आली असून, त्यापैकी शेतकऱ्यांनी ५१३.१३ हेक्‍टर जमीन उपलब्ध करून दिली आहे. या जमिनीचा मोबदला म्हणून ३६८ कोटी ३७ लक्ष ४६ हजार २९८ रुपये शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.

Web Title: farmer 614 crore rupees Remuneration