शेतकऱ्यांनाही इंधन दरवाढीचा फटका

Petrol
Petrol

अमरावती - सध्या सोयाबीनच्या कापणीला सुरुवात झाली आहे. उन्हही कडक तापू लागल्याने शेंगा चांगल्या वाळत आहेत. तथापि, नियमित सोयाबीनला अजून महिनाभर वेळ आहे. सोयाबीन कापणीचा खर्च शेतकऱ्यांना येतोच. त्यात डिझेलचे दर रोजच वाढू लागले आहेत. याचा फटकाही शेती उत्पादनाला बसू लागला आहे. यामुळे या दरवाढीविरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे.

सध्या सोयाबीनची कापणी सुरू झाली. सोयाबीन पेरणीपासून घरापर्यंत पोहोचेपर्यंत प्रचंड खर्च येतो. आधीच बियाणे, कीटकनाशक व खतांचे वाढलेले दर, सिंचन करण्याची मजुरी, कापणी व थ्रेशरमधून काढणीचा खर्च यात शेतकरी प्रचंड भरडला जातो. बरेचदा उत्पादनखर्चही निघत नाही. तरीही शेतकरी मोठ्या हिंमतीने पीक घेत आहे. दोन महिन्यांपासून पेट्रोल व डिझेलचे दर सतत वाढत आहेत. या दरवाढीचाही सामना सोयाबीन काढताना शेतकऱ्याला करावा लागत आहे. 

गतवर्षी सोयाबीन काढण्याचा दर १७० ते १८० रुपये प्रतिक्विंटल असा होता. आता डिझेलचे दर वाढल्याने थ्रेशरमशीन मालकाने तो २०० ते २१० रुपये करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्याला एका पोत्यामागे एवढी रक्कम द्यावी लागली, तर त्याचा उत्पादनखर्चही निघेनासा होतो. सोयाबीन काढण्याचा दर डिझेलवाढीच्या नावावर एकवेळा वाढला की, मशीनवाले नेहमीसाठी तोच दर कायम ठेवतात. नियमित सोयाबीन कापणीला येण्यापूर्वी डिझेलचे दर कमी झाले, तरच शेतकरी यातून वाचणार हे वास्तव आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com