गडकरींच्या वाड्यावरून शेतकऱ्याला माघारी पाठविले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

स्वीय सहायकांनी निवेदन मला द्यायचे असेल तर द्या नाही तर येथून निघा, असा दम भरल्याचा आरोप जाधव यांनी केला. गडकरींची भेट न झाल्याने जाधव पुढे अमरावतीकडे रवाना झाले. अमरावती येथे ते प्रहार संस्थेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांची भेट घेणार आहेत

नागपूर - भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरून अपमान केल्याचे प्रकरण ताजे असताना आज आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा अस्थिकलश घेऊन निघालेल्या सांगली जिल्ह्यातील साखराळे येथील शेतकरी विजय जाधव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्यास गेले होते. त्या वेळी निवासस्थानी मंत्री गडकरी यांची भेट घेऊ न देता अपमानास्पद वागणूक देऊन परत पाठविल्याचा आरोप झाल्याने पुन्हा वाद निर्माण झाला आहे.

गेल्या 6 मेपासून कोल्हापूर येथून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्‍न मांडण्यासाठी आत्महत्याग्रस्त शेतकरी अस्थी व रक्षा कलश दर्शन यात्रा विजय जाधव यांनी सुरू केली. आज ते सकाळी नागपुरात पोचले. त्यांनी नितीन गडकरींना भेटण्यासाठी त्यांचे महाल भागातील निवासस्थान गाठले. तेथील सुरक्षारक्षकांनी त्यांना पहिल्यांदा प्रवेश दिला नाही. काही वेळाने गडकरींचे स्वीय सहायक कार्यालयात आले. नितीन गडकरी घरी असूनही स्वीय सहायकांनी गडकरी साहेबांशी भेट होऊ दिली नाही. निवेदन मलाच द्या. सही करून तुम्हाला रिसिव्हड देतो, असे त्यांच्या स्वीय सहायकांनी सांगितले. मला केवळ गडकरींना भेटायचे आहे, असे जाधव यांनी सांगितल्यानंतर स्वीय सहायकांनी निवेदन मला द्यायचे असेल तर द्या नाही तर येथून निघा, असा दम भरल्याचा आरोप जाधव यांनी केला. गडकरींची भेट न झाल्याने जाधव पुढे अमरावतीकडे रवाना झाले. अमरावती येथे ते प्रहार संस्थेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांची भेट घेणार आहेत.

अपमानास्पद वागणूक दिली नाही - देऊळगावकर
या संदर्भात नितीन गडकरी यांचे स्वीय सहायक सुधीर देऊळगावकर यांच्याशी संपर्क साधला असता, विजय जाधव यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा इन्कार त्यांनी केला. नितीन गडकरी साहेब पहाटे परदेशातून आल्यामुळे ते सध्या उपलब्ध होऊ शकत नाहीत. आपण निवेदन द्या, ते स्वाक्षरी करून तुम्हाला देतो, असे सांगितले होते. जाधव यांनी निवेदन देण्यास नकार दिला. यात अपमानास्पद वागणूक देण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही, असे देऊळगावकर म्हणाले.

विदर्भ

वर्धा : आष्टी तालुक्यातील वडाळा येथील शेतकरी शेतातून बैल घरी परत आणत असताना एका वाघिणीने हल्ला चढवला. या हल्ल्यात बैल पळून...

03.42 PM

एटापल्ली (जिल्हा गडचिरोली) : तालुक्यातील कसनसुर जारावंडी मुख्य रस्त्यावरून वाहणारे झुरी नाला व कांदळी नाल्यावरील पुलाचे नुकसान...

02.09 PM

नागपूर - केंद्र सरकारने तूर, उडीद आणि मूग डाळींवरील निर्यातबंदी उठवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या डाळीसह कडधान्यांच्या भावात दोनशे ते...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017