10 वर्षांनी आठवले शेतकरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

नागपूर - पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांची जमीन ताब्यात घेऊन रस्ता तयार केला. जमिनीचा मोबदला सोडा, साधी संमतीही घेण्याचे सौजन्यही दाखविले नाही. दहा वर्षांनंतर पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांची संमती घेण्यासाठी आटापिटा चालविला आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणांकडून शेतकऱ्यांच्या पिळवणुकीचे आणखी एक उदाहरण पुढे आले आहे.

उमरेड तालुक्‍यातील निम्न वेणा प्रकल्पांतर्गत पिपरा गावात पाटबंधारे विभागाकडून नांद जलसेतू कालवा तयार करण्यात आला. या कालव्यावर पूलही तयार केला. २००८ मध्ये सर्व्हे क्र. ४४४, ४८९, ४८०, ४९१, ४९२ व ४९३ च्या शेत जमिनीतून पिपरा-शेडेश्‍वर असा रस्ता तयार केला. मोबदल्यासाठी शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाचे उंबरठे झिजविले. मात्र, निद्रिस्त प्रशासनाने झोपेचे सोंग घेतले. आता जागेची संमती घेण्यासाठी शेतकऱ्यांना पत्र पाठविल्याची माहिती सूत्राने दिली.

इतकी वर्षे केले काय?
मोजणीनंतर भूसंपादन झाले नसल्याबाबत दस्तुरखुद्द पाटबंधारे विभागाने नोव्हेंबर २०१७ ला जिल्हाधिकारी कार्यालयास कळविले. त्यामुळे आता भूसंपादनाबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे. दहा वर्षे पाटबंधारे विभागाने काय केले?, शेतकऱ्यांच्या मनस्तापास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होईल काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Web Title: farmer land road irrigation department