वेगळ्या विदर्भातही शेतकऱ्यांवर अन्याय?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 ऑक्टोबर 2016

नागपूर - विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे वसंतराव देशपांडे सभागृहात विदर्भ राज्याच्या दुसऱ्या प्रतिरूप अधिवेशनास सोमवारी प्रारंभ झाला. विरोधकांनी स्वामिनाथन आयोग लागू करा, सातबारा कोरा करा अशा घोषणा दिल्या. 

सत्ताधारी फारसे गांभीर्य दाखवत नसल्याने गदारोळ घातला. यामुळे सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब करावे लागले. सत्ताधाऱ्यांनी विकासाच्या मुद्यावर तडजोड नाकारली तर विदर्भाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विरोधकही आक्रमक असल्याने दिवसभर चांगलीच जुगलबंदी रंगली. 

प्रश्‍नोत्तराच्या तासात विरोधकांनी स्वामिनाथन आयोग लागू करा, विजेचे दर निम्मे करा, शेतमालाला रास्त भाव द्या, सातबारा कोरा करा आदी मागण्या रेटल्या. सरकार महत्त्वाच्या विषयाकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप करीत विरोधकांनी सभात्याग केला. परतल्यानंतर पुन्हा त्याच विषयावर अध्यक्षांच्या आसनापुढे घोषणा दिल्या. 

विरोधकांची आक्रमकता लक्षात घेत अध्यक्षांनी सभागृह तहकूब केले. त्यानंतर लक्षवेधी सूचनेवर गृहमंत्रालयाशी संबंधित विषयावर चर्चा सुरू असताना विरोधकांना प्रश्‍न विचारण्यावरून डिवचण्यात आल्याने पुन्हा गदारोळ झाल्याने अध्यक्षांनी कामकाज तहकूब केले. 

राज्यपाल, मुख्यमंत्र्यांचा शपथविधी
नागपूर उच्च न्यायालयाच्या प्रतिरूप मुख्य न्यायाधीशांनी डॉ. मधुकर निसळ यांना विदर्भ राज्याचे राज्यपाल म्हणून शपथ दिली. त्यानंतर राज्यपालांनी प्रतिरूप मुख्यमंत्री वामनराव चटप आणि अन्य मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यानंतर सभागृहाने ॲड. मोरेश्‍वर टेंभुर्डे यांची प्रतिरूप विधानसभाध्यक्ष म्हणून निवड केली. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर प्रश्‍नोत्तरे, लक्षवेधीचा तास झाला. अर्थमंत्री डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी अर्थसंकल्प सादर केला. 

Web Title: farmers injustice in Separate Vidarbha