सरकारच्या निर्णयाचा किसान संघाने केला विरोध

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जून 2016

नागपूर : भारतात डाळीसाठी सुपीक जमीन असताना सरकार परदेशात जमीन भाड्याने घेत आहे. यामुळे देशातील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा विरोध भारतीय किसान संघाने केला आहे.

नागपूर : भारतात डाळीसाठी सुपीक जमीन असताना सरकार परदेशात जमीन भाड्याने घेत आहे. यामुळे देशातील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा विरोध भारतीय किसान संघाने केला आहे.

देशात डाळीचे भाव आकाशाला भिडले आहेत. यावर सरकार परदेशातील जमिनी भाड्याने घेऊन त्यावर डाळीचे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भारतात मोठ्या प्रमाणात जमिनी उपलब्ध आहे. ती सुपीक आहे. येथील शेतकऱ्यांना भाव मिळत नसल्यामुळे याकडे दुर्लक्ष होत आहे. सरकारने योग्य भाव दिल्यास मोठ्या प्रमाणात डाळीचे उत्पादन होऊ शकते, असेही किसान संघाचे विदर्भाचे अध्यक्ष नाना आखरे, अजय बोंदरे, रामराव घोंगे, प्रा. मनोहर बुटे यांनी पत्रकात म्हटले आहे. या संदर्भात केंद्रीय मंत्री रामविलास पासवान, नितीन गडकरी, अरुण जेटली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे.