Court
Court

वडिलांची जात मुलाला नाकारली!

नागपूर - वडिलांना ज्या जातीचे प्रमाणपत्र देण्यात आले, त्याच जातीचा मुलाचा दावा जात वैधता पडताळणी समितीने नाकारला आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदीप डांगे यांच्याच बाबतीत हा प्रकार घडला असून, या प्रकरणात न्यायालयाने समितीच्या सदस्यांना अवमान नोटीस बजावली आहे.

प्रदीप डांगे यांचे सुपुत्र श्रेयस प्रदीप डांगे यांनी ही याचिका दाखल केली आहे. प्रदीप यांचे भाऊ चंद्रकांत डांगे हे आयएएस अधिकारी असून, जळगाव महापालिकेचे आयुक्त आहेत. प्रदीप डांगे यांनी काही वर्षांपूर्वी अनुसूचित जमाती प्रवर्गाचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यांच्या वडिलांकडे हलबा/हलबी असे दस्तऐवज आहेत. मात्र, काही दस्तऐवजांवर कोष्टी असल्याचा उल्लेख असल्याने त्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र नाकारण्यात आले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यात आले. आता त्यांचा मुलगा श्रेयस याने जात पडताळणीसाठी अर्ज केला.

मात्र, समितीने दक्षता पथकाच्या अहवालाच्या आधारावर त्याचा अर्ज फेटाळला. त्याविरुद्ध त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणात उच्च न्यायालयाचा एक आदेश असताना पुन्हा पडताळणी समितीने जात पडताळणी प्रमाणपत्र नाकारणे हा न्यायालयाचा अवमान असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. त्या वेळी न्यायालयाने समितीच्या सदस्यांना अवमान नोटीस बजावून 26 सप्टेंबरला व्यक्तिश: हजर राहण्याचे आदेश दिले. न्या. भूषण गवई आणि न्या. सुनील शुक्रे यांच्यासमक्ष ही सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांतर्फे ऍड. श्रीरंग भांडारकर आणि सरकारतर्फे ऍड. सुशील घोडेस्वार यांनी बाजू मांडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com