बापाचा मुलीवर बलात्कार; नराधम बापाला अटक 

अनिल कांबळे 
गुरुवार, 12 एप्रिल 2018

तिने प्रतिकार केला असता पट्ट्याने मारहाण केली. त्यानंतर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. चाकूचा धाक दाखवून कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

नागपूर - दारूड्या बापाने 17 वर्षीय सख्या मुलीला पट्ट्याने झोडपून बलात्कार केला. बापलेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना आज गुरूवारी पिवळी नदी यशोधरानगरात उघडकीस आली. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी नराधम बापाविरूद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अश्‍विनी (बदललेले नाव) ही अकरा वर्गाची विद्यार्थिनी आहे. ती आई, वडील आणि मोठ्या भावासह पिवळी नदी परीसरात किरायाने राहते. घरची आर्थिक स्थिती योग्य नसल्यामुळे ते सर्व मजूरीला जातात. तिचे वडील शामराव हा दारूडा असून तो उप्पलवाडीतील एका कंपनीत मजुरी करतो. मात्र, आठवड्यातून दोन ते तीन दिवस दारू पिऊन घरीच राहत होता. मुलगी दहावीत असतानाच वडील तिच्याशी अश्‍लिल चाळे करीत होता. गेल्या दिड वर्षांपासून तो मुलीसोबत घाणरडे वर्तन करीत होता. मात्र, वडील असल्यामुळे तिन गप्प होती. सध्या अकरावीची परीक्षा सुरू असून ती गेल्या सहा एप्रिलला पेपर देऊन घरी आली. त्यावेळी आरोपी वडील दारू पिऊन घरात झोपला होता. ती शाळेचे कपडे बदलत असताना वडीलाने तिच्याशी अश्‍लिल चाळे करीत शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने प्रतिकार केला असता पट्ट्याने मारहाण केली. त्यानंतर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. चाकूचा धाक दाखवून कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून नराधम बापाला अटक केली. 

असा झाला भंडाफोडा -
पीडित मुलीची मोठी बहिण भावे नगरात राहते. तिच्याकडे गेल्यानंतर तिने पोटात दुखत असल्याचे सांगितले आणि अचानक रडायला लागली. तिला विश्‍वासात घेऊन विचारपूस केली. तिने वडीलाने गेल्या दीड वर्षांपासून केलेल्या अन्यायाचा पाढाच वाचला. तिने लगेच आईला फोन करून माहिती दिली. सायंकाळी घरी बैठक घेऊन विचारणा केली असता बापाने कुकृत्य केल्याची कबुली दिली. 

पीडित विद्यार्थिनी आईसह पोलिस ठाण्यात आली. तिची महिला अधिकाऱ्यांनी आस्थेने विचारपूस केली. तिच्या भावना जाणून घेतल्यानंतर तिने आपबिती सांगितली. तक्रारीवरून लगेच गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पुढील तपास सुरू आहे. 
- पुंडलिक मेश्राम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, यशोधरानगर पोलिस स्टेशन.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Father raped his own daughter