नागपूरात नवरदेवावर बलात्काराचा गुन्हा दाखल 

अनिल कांबळे 
सोमवार, 4 जून 2018

मुलाने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. 2012 पासून त्यांचे एकमेकांसोबत संबंध होते. लग्न ठरविण्यासाठी नातेवाईक मुला-मुलीच्या कुटुंबाची बैठक झाली.

नागपूर - लग्नाची संपूर्ण तयारी झाली होती. लग्नमंडपात वऱ्हाडी नवरदेवाची वाट पाहत होते. नवरदेव लग्न करण्यास तयार नसल्याचा संदेश वधूपक्षाला आला. त्यामुळे असे लग्नमंडपात एकच गोंधळ उडाला. वधुला माहिती मिळताच रडपड सुरू झाली. त्यानंतर वधूने आक्रमक भूमिका घेत वरपक्षाच्या या निर्णयाविरूद्ध सक्‍करदरा पोलिस ठाण्यात धाव घेतली. नवदेवावर बलात्कार केल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून नवरदेवासह पाच जणांवर गुन्हे दाखल केले. प्रवीण शिवचरण शामकुंवर (30), आई सुशीलाबाई शिवचरण शामकुंवर, प्रणिता नितीन साळवे, अनिता सचिन बहादुरे आणि अनिता सौमित्र मेश्राम (सर्व रा. भांडे प्लॉट, सेवादलनगर) अशी आरोपींची नावे आहेत. 

आरोपी नवरदेव प्रवीण हा एका औषध कंपनीत औषध वितरक म्हणून काम करतो. तर पीडित मुलगी खासगी नोकरी करते. आरोपी हा पीडितेचा नातेवाईक आहे. त्यामुळे दोघांची ओळखी असून त्याने तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. 2012 पासून त्यांचे एकमेकांसोबत संबंध होते. लग्न ठरविण्यासाठी नातेवाईक मुला-मुलीच्या कुटुंबाची बैठक झाली. त्यावेळी प्रवीण व त्याच्या आईने विवाह करण्याची तयारी दर्शवली. रविवारी त्यांचा विवाह समारंभ होता. पीडित मुलीच्या आईवडिलांनी लग्नाची सर्व तयारी केली. सर्व नातेवाईक आले होते. पाहुण्यांचे जेवण तयार करण्यात आले. मात्र, आरोपी व त्याचे नातेवाईक लग्न मंडपात पोहोचलेच नाही. त्यांनी वरपक्षाने तीन लाख रुपये हुंड्याची मागणी घातली. त्यामुळे पीडितेने सक्करदरा पोलिस ठाणे गाठले व तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक पंजाबराव डोळे यांनी बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. 

दोन वेळेस तुटले लग्न -
प्रवीणने यापूर्वी बुटीबोरी आणि चंद्रमणी नगरातील मुलींशी लग्न ठरविले होते. मात्र, प्रवीणच्या प्रेयसीने त्या मुलींच्या घरी जाऊन सर्व हकीकत सांगितल्यानंतर ते दोन्ही लग्न तुटले. प्रवीणने प्रेमप्रकरणाची माहिती लपवून आई व बहिणीच्या मर्जीसाठी लग्नास तयार होत होता.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: filed a rape case against groom at nagpur