स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावांना कायमस्वरुपी रस्ता

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावांना कायमस्वरुपी रस्ता

संग्रामपूर (बुलढाणा) : स्वातंत्र प्राप्ती नंतर तालुक्यातील चार गावांना रस्त्याच्या माध्यमातून कायमस्वरूपी जोडण्याचे काम प्रथमच 7 ऑक्टोबर रोजी भूमिपूजन कार्यक्रमातून आमदार संजय कुटे यांनी केले आहे. याचा आनंद व्यक्त करून या ठिकाणच्या नागरिकांनी पक्षभेद विसरून विद्यार्थ्यांसह आमदारांचा सत्कार केला.

सहकारातील ज्येष्ठ नेते दिवंगत जनार्दन चोपडे याचे नेकणामपूर गावाच्या
 कायमस्वरूपी रस्त्याचे अधुरे स्वप्न या निमित्ताने पूर्ण होत असल्याने खऱ्या अर्थाने त्याना श्रद्धाजली अर्पण करण्यात आली. ही बाब गावकऱ्यानी जल्लोषातून दाखवून दिली. या तालुक्यातील नेकणामपूर ह्या गावाला रस्त्याचा प्रश्न खूपच भेडसावणारा होता. पावसाळ्याचे दिवसात वाण नदीपात्रातून नागरिक व शालेय विद्यार्थी यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता. गावासाठी रस्ता झाला पाहिजे या साठी ग्रामस्थांच्या वतीने वारंवार शासन दरबारी समस्या मांडण्यात आली. 

या गावाचे दिवंगत सहकार नेते जनार्दन चोपडे यांनी तर कायमस्वरूपीच्या रस्त्यासाठी खूप प्रयत्न केले होते. मात्र, केवळ माती टाकून तात्पुरती डागडुजी करून बोळवण करण्यापलीकडे प्रशासनाकडून काहीच झाले नाही. 7 ऑक्टोबर रोजी आमदार संजय कुटे याचे हस्ते या गावातील रस्ताच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. त्यावेळी ग्रामस्थांनी पक्षभेद विसरून गावाच्या विकासासाठी दाखवलेली एकी आणि चेहऱ्यावर असलेला आनंद लोकप्रतिनिधी म्हणून प्रेरणा दायी ठरल्याचे मत आमदार कुटे यांनी व्यक्त केले.

या गावा सोबतच पूर्णा काठच्या भोन गावाची समस्या गंभीर होती. पूर्णा नदीला महापूर आला म्हणजे या गावाला वेढा पडत असे. व गावाचा संपर्क तुटत होता. आता पर्यंत या गावासाठी पूलाची मागणी करणाऱ्याचा सर्वच स्तरावरून भ्रमनिरासच झाला. परंतु, आमदार कुटे यांनी या कामासाठी निधी उपलब्ध करण्याबाबत शासनाकडे व्यवस्थीत रित्या प्रश्न मांडून मजूर करून घेतला. या ठिकाणचे लोकांनीही ह्या कामाबद्दल आमदारांचे मनोमन कौतुक केले. 

पिप्री काथरगाव, सगोडा दानापूर हे दोन गावाचे पूल खूपच महत्वाचे असल्याने यासाठीही निधी ची उपलब्धता करण्यात आमदारांना यश आले व या कामाचेही भूमिपूजन झाल्याने मोठा प्रश्न निकाली निघाला. रस्त्याचे जाळे तयार करून गावांना जोडण्याचे काम या तालुक्यात जोमाने होत असल्याचे चित्र आहे. तालुक्यात ठिकठिकाणी झालेल्या कोट्यवधी रुपयांची भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यात तालुक्यातील भाजपा नेते पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, जिल्हा परिषद वपंचायत समिती पदाधिकारी याचा समावेश होता.

मतदारसंघातील शेवटच्या घटकापर्यंत प्राधान्याने, रस्ते आणि पाणी पोहचविन्याचे काम लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या हातून होत आहे. अनेक गावांना रस्ते आणि पुलाच्या समस्या त्रस्त करणाऱ्या होत्या. यात शालेय विद्यार्थी, नागरिक यांची होणारी होरपळ मनाला अस्वस्थ करणारी वाटत होती. त्यासाठी कसेही करून निधी उपलब्ध करणे हेच ध्येय ठेऊन मतदार संघाचा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमदार म्हणून माझा असणार आहे.
  - संजय कुटे, आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com