भारतीय विदेशींना जुन्या नोटा बदलवून देण्यास नकार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

नागपूर - रिझर्व्ह बॅंकेकडून विदेशी भारतीय नागरिकांना जुन्या नोटा बदलून देण्यास नकार दिला जात आहे. यामुळे जुन्या नोटा बदलवायच्या कुठे असा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. अनिवासी भारतीयांना नोटा बदलून दिल्या जात असताना आम्हाला दुसरा न्याय का लावला जात आहे. याबद्दल विदेशी भारतीय नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. 

नागपूर - रिझर्व्ह बॅंकेकडून विदेशी भारतीय नागरिकांना जुन्या नोटा बदलून देण्यास नकार दिला जात आहे. यामुळे जुन्या नोटा बदलवायच्या कुठे असा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. अनिवासी भारतीयांना नोटा बदलून दिल्या जात असताना आम्हाला दुसरा न्याय का लावला जात आहे. याबद्दल विदेशी भारतीय नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. 

अनिवासी भारतीयांना 30 जूनपर्यंत तर नोटाबंदीच्या काळात विदेशात गेलेल्या नागरिकांना 31 मार्चपर्यंत जुन्या नोटा बदलण्याची सुविधा आहे. त्यामुळे अनिवासी भारतीयांसह विदेशात गेलेल्या नागरिकांची नोटा बदलविण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेत गर्दी होत आहे. मात्र, विदेशी भारतीय नागरिकांना नोटा बदलून देण्यास नकाराला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रांगेत उभे राहण्याचा वेळ तर जात आहे. शिवाय जुन्या नोटांचे करायचे काय असा प्रश्‍नही त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. आमचे वास्तव्य विदेशात असले तरी मूळ भारतीय आहोत. त्यामुळे भारतात परतताना चलनाची अडचण येऊ नयेत म्हणून आम्ही विदेशात जाताना भारतीय चलनी नोटासोबत घेऊन जात असतो. केंद्र सरकारने अचानक नोटाबंदीचा निर्णय घेतल्याने त्यांच्याजवळील नोटा बाद झाल्यात. कामानिमित्त भारतात आल्याने जुन्या नोटा बदलविण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेत आलो. तब्बल एक तास रांगेत उभा राहिलो. काउंटरवर गेल्यावर कळाले की, विदेशी भारतीय नागरिकांना जुन्या नोटा बदलवून मिळत नाहीत. तर मग आता या नोटांचे करायचे काय असा प्रश्‍न आम्हाला पडला आहे. 

रिझर्व्ह बॅंकेने वेबसाईटवर नोटाबंदीच्या निर्णयाचे पत्रक आहे. त्यात याबद्दल स्पष्टता केल्याचे संबंधित अधिकारी सांगत असले तरी आदेशाबद्दल स्पष्टता नसल्याचे अमेरिकेतून आलेल्या एका विदेशी नागरिकांनी स्पष्ट केले. याबाबत भारतीय दूतावासासोबत संपर्क करणार असून, यावर तोडगा काढण्याच्या सूचना करणार आहेत. 

रिझर्व्ह बॅंकेने फक्त अनिवासी भारतीय आणि नोटाबंदीच्या काळात विदेशात गेलेल्या नागरिकांनाच नोटा बदलून दिल्या जाईल, असे स्पष्ट केलेले आहे. त्यानुसार नोटा बदलून देण्यात येत आहेत. 
- श्री. भगत, प्रसिद्धी अधिकारी, रिझर्व्ह बॅंक 

विदर्भ

नागपूर -  सरासरीपेक्षा अधिक तीन तास विक्रमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील अनेक वस्त्या जलमय झाल्या. नदी-नाले दुथडी भरून वाहत...

11.03 AM

वर्धा - कारंजा तालुक्यातील सेलगाव येथील राहत्या घरी कपाटला अचानक विजेचा प्रवाह उतरल्याने त्याच्या झटका बसून आईसह चिमुकलीचा...

10.51 AM

अकोला : सन २०१२ नंतर देशामध्ये सर्वच राज्यात जुलै २०१७ मध्ये पंचवार्षीक पशुगणना होणे अपेक्षीत होते. मात्र, केंद्राचे अनुदान आणि...

09.03 AM