ताडोबात वाघाच्या हल्ल्यात वनकर्मचारी ठार

टीम ई सकाळ
गुरुवार, 11 मे 2017

विदर्भातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील गाभा क्षेत्रात (कोअर झोन) वाघाच्या हल्ल्यात चौकीदार ठार झाल्याची घटना आज (गुरूवार) घडली. 

नागपूर : विदर्भातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील गाभा क्षेत्रात (कोअर झोन) वाघाच्या हल्ल्यात चौकीदार ठार झाल्याची घटना आज (गुरूवार) घडली. 

मंगलदास तानबा चौधरी (वय 50, रा. नवेगाव) असे चौकीदाराचे नाव आहे. ते महाराष्ट्र सरकारच्या वन विकास कॉर्पोरेशनमध्ये अग्निरक्षक म्हणून काम करत होते. ताडोबा कोअर झोनमधील कक्ष क्रमांक 94 मधील सुरक्षेची जबाबदारी त्यांच्याकडे होती. 

वन विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार, चौधरी सकाळी सात वाजता शौचासाठी बाहेर गेले असता वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. 

घटनेचा अधिक तपशील मिळू शकलेला नाही.