भरवस्तीत लांडग्याने केली बकरीची शिकार

fox killed goat in
fox killed goat in

चिमूर : चिमूर नगर परीषद क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 12 मधील रजा सुन्नी मस्जीदला लागुन रहेमान शेख यांचे घर आहे. यांच्या घरी बांधुन असलेली बकरी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास दोन लांडग्यांनी शिकार करून अर्धापेक्षा जास्त फस्त केली या घटनेमुळे परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाढत्या लोकसंख्यामुळे वन जंगल क्षेत्र कमी होऊन सिंमेट जंगल क्षेत्र वाढलेले आहे. ज्यामुळे वन्यप्राणी आणी मानवी संघर्ष वाढले असुन मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचे वावर वाढला आहे. यामुळे वन्यप्राण्यांच्या आणि मानवाच्या अस्तीत्वाला धोका निर्माण झाला आहे. चिमूर हे लहान गाव असताना गावात लांडगे, कोल्हे आणि बिबटे येऊन पाळीव प्राण्यांची शिकार करायचे. मात्र चिमूर शहराचा विस्तार होऊन अनेक नविन वसाहती निर्माण झाल्याने वण्य प्राणी गावात येऊन शिकार केल्याची घटना आजपर्यंत घडली नाही. 

घराला लागुन असलेल्या ओसरी मध्ये बकरी बांधली होती. मध्यरात्री साडेबाराच्या दरम्यान अचानक आवाज आला. तर तिथे दोन लांडग्यांनी बकरीला फाडून खाल्याचे दिसल्याने त्यांनी आरडा ओरडा केल्याने लांडगे पळाले. मात्र शेख पुन्हा झोपले असता लांडगे परत येऊन बकरी ओढत गल्लीत नेऊन पुन्हा त्यावर ताव मारला. सकाळी याची सुचणा वन विभागाला देण्यात आली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचणामा केला तसेच लांडग्याचे पग मार्क घेतले. रहेमान शेख यांच्या या झालेल्या नुकसानाची भरपाई वन विभागाने करावी अशी मागणी नगरसेवक विनोद ढाकुणकर यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com