खासगी शिकाऱ्याविरुद्ध मोर्चा

अमरावती रोड - खासगी शिकाऱ्याविरुद्ध असंतोष व्यक्त करण्यासाठी मोर्चात सहभागी झालेले स्वयंसेवी संस्थांचे सदस्य आणि वन्यजीवप्रेमी.
अमरावती रोड - खासगी शिकाऱ्याविरुद्ध असंतोष व्यक्त करण्यासाठी मोर्चात सहभागी झालेले स्वयंसेवी संस्थांचे सदस्य आणि वन्यजीवप्रेमी.

नागपूर - वन विभागात प्रशिक्षित कर्मचाऱ्यांवर अविश्‍वास दाखवून राळेगाव येथील वाघिणीला मारण्यासाठी शिकारी शाफत अली खान याच्या नेमणुकीला विरोध करण्यासाठी विदर्भातील वन्यजीवप्रेमी आणि स्वयंसेवी संस्थांनी बुधवारी महाराजबाग ते संविधान चौकापर्यंत मोर्चा काढला. या शिकाऱ्याला माघारी बोलविण्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत ही मोहीम थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली. 

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव-पांढरकवडा तालुक्‍यात तेरा जणांचा जीव घेणाऱ्या टी-वन वाघिणीला ठार मारण्यासाठी हैदराबाद येथील अली याची वनविभागाने नियुक्ती केली आहे.  यामुळे अधिकाऱ्यांमध्येच दोन गट पडले असून वन्यजीवप्रेमी आणि स्वयंसेवी संस्थांनीही या नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे. आज विदर्भातील वन्यजीवप्रेमी आणि स्वयंसेवी संस्थेच्या सदस्यांनी वाघाचे मुखवटे चितारुन निषेध नोंदवत मोर्चा काढला.

महाराजबाग येथून निघालेला मोर्चा संविधान चौकात पोहोचल्यानंतर शासनाविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (पूर्व वन्यजीव) सुनील लिमये यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत निवेदन स्वीकारले. विनित अरोरा, जेरील बानाईत आणि पराग दांडगे यांचे नेतृत्वातील प्रतिनिधी मंडळाची सुनील लिमये यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए. के. मिश्रा यांची भेट घडवून आणली. प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकल्यानंतर शासनाकडे तुमच्या मागणीचे निवेदन पाठविण्यात येईल,  असे आश्‍वासन दिले. वरिष्ठांचे दडपण असल्याचे याचा निर्णय घेत येत नसल्याचे शिष्टमंडळाला सांगण्यात आले. त्यामुळे ‘ते’ वरिष्ठ कोण असा प्रश्‍न विचारला जाऊ लागला आहे.

मोर्चेकऱ्यांच्या मागण्या 
 बेशुद्ध करणाऱ्या चमूला कमी आणि शाफत अली खान या शिकाऱ्याला अधिक वेळ दिला जात आहे. हे त्वरित थांबविण्यात यावे
 शाफत अली खान या गुन्हेगार प्रवृत्तीच्या शिकाऱ्याला त्वरित परत पाठवावे 
 एनटीसीएने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार वाघिणीला जेरबंद करण्यात यावे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com