इंधन दरवाढीमुळे भाज्याही महाग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

नागपूर - पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा परिणाम भाजीपाला वाहतुकीवरही झाल्याने, आठवडाभरात भाजीपाला महागला आहे. इंधन दरवाढीपाठोपाठ धान्य, खाद्यपदार्थ आणि आता भाज्यांचे दर वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. 

नागपूर - पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा परिणाम भाजीपाला वाहतुकीवरही झाल्याने, आठवडाभरात भाजीपाला महागला आहे. इंधन दरवाढीपाठोपाठ धान्य, खाद्यपदार्थ आणि आता भाज्यांचे दर वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. 

आज पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८६ रुपये आहे. त्यामुळे एखाद-दुसरी पालेभाजी सोडली तर आठवडी बाजारात भाज्यांचे दर वाढले आहेत. गवार, भेंडी, टोमॅटो, मिरची, तोंडली, कारले इत्यादी भाज्यांचे दर वाढले आहेत. नागपूर जिल्ह्यातील पाचगाव, दहेगाव, सावनेर, कळमेश्वर आणि आसपासच्या गावांतील शेतकऱ्यांकडून फुलकोबी, पालक, कोथिंबीर, टोमॅटो आणि भेंडी कॉटन मार्केटमध्ये विक्रीसाठी येते. इंधर दरवाढ झाल्याने ठोक विक्रेत्यांनीही दरात वाढ केली. पाठोपाठ किरकोळ विक्रेत्यानीही भाजीचे दर चार ते सात रुपयांनी वाढविले आहेत. 

टोमॅटो, मिरची, कोथिंबीर महाग
स्थानिक उत्पादक शेतकऱ्यांकडून टोमॅटोची आवक वाढली आहे. किरकोळ बाजारात २० ते २५ रुपये किलो दर आहेत. कोथिंबीर नांदेड, छिंदवाडा येथून बाजारात विक्रीस येते. वाढीव वाहतूक खर्चामुळे किरकोळ बाजारात कोथिंबीर  ६० रुपये किलो दराने मिळते. हिरव्या मिरचीचे दर दर्जानुसार ५० ते ६० रुपये किलो आहेत.

पेट्रोल, डिझेलच्या दरावर महागाईचे गणित अवलंबून असते. वेगवेगळ्या भागांतून भाज्यांची आवक होते. इंधन दरवाढ झाल्यानंतर वाहतुकीचा खर्च वाढतो त्यामुळे भाजीच्या भावात वाढ होत आहे. पावसाळ्यात आवक वाढल्यास भाज्याही स्वस्त होतील.
- राजेश साबळे, भाजी विक्रेते.

Web Title: fuel rate vegetable