फुंडकर यांच्या निधनाने संयमी मार्गदर्शक हरवला - संजय राठोड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

यवतमाळ - राज्याचे कृषीमंत्री पांडूरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. बुधवारी सायंकाळी मुंबईहुन निघण्यापूर्वीच भाऊसाहेबांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. आज यवतमाळ येथे पोहचताच त्यांच्या निधनाची दु:खद बातमी कळली तेव्हा तीव्र वेदना झाल्या. भाऊसाहेबांच्या निधानामुळे मंत्रिमंडळातील आमचा एक संयमी मार्गदर्शक हरवला, अशी शोकसंवेदना महसूल राज्यमंत्री संयज राठोड यांनी व्यक्त केली. 

जनता आणि पक्ष दोन्हींसोबत कायम एकनिष्ठ राहून त्यांनी प्रमाणिकपणे समाजकारण व राजकारण केले. संयम, एकनिष्ठा, पारदर्शकता, अभ्यासू व्यक्तिमत्व हे त्यांचे गुण सर्वांसाठीच अनुकरणीय व प्रेरणादायी ठरतील. कृषीमंत्री या नात्याने राज्यातील शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्याची भावना ठेवूनच शेतकरीहिताचे अनेक निर्णय त्यांनी घेतले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. स्व. भाऊसाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशी प्रतिक्रिया ना. राठोड यांनी दिली.

Web Title: fundakar death lost a moderate guide - Sanjay Rathod