कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्यावर अंत्यसंस्कार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

खामगाव: राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्यावर शेगाव रोडवरील सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पसमध्ये आज शोकाकूल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भाजपाचे अनेक मंत्री, विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते व चाहत्यांनी भाऊसाहेब फुंडकर यांना अखेरचा निरोप दिला.

कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांचे गुरुवारी पहाटे मुंबई येथे निधन झाले. सायंकाळी त्यांचे पार्थिव खामगाव येथे आणण्यात आले. यावेळी अंत्यदर्शनासाठी शोकाकूल कार्यकर्ते व चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, आज सकाळी त्यांची अंत्ययात्रा निघाली. शहरातील प्रमुख मार्गाने अंत्ययात्रा जात असताना अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी झालेली पहायला मिळाली. अत्यंत शोकाकूल वातावरणात पांडुरंग फुंडकर यांना निरोप देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह अनेक दिग्गज नेते भाऊसाहेब फुंडकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजर होते. 

अंत्ययात्रेत उलटला जनसागर
भाऊसाहेब फुंडकर यांची अंत्ययात्रा आज येथील वसुंधरा या निवासस्थानावावरुन निघाली. त्यांच्या अंत्ययात्रेत मोठा जनसागर उपस्थित होता.

Web Title: Funeral of Bhushaaheb Phundkar