स्वतःवर गोळी झाडून CRPF जवानाची गडचिरोलीत आत्महत्या

प्रकाश दुर्गे
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

हा जवान मूळचा हरियाना राज्यातील आहे. अमित यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

अहेरी : केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) एका जवानाने रिव्हॉल्वरमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे आज (शुक्रवार) सकाळी सव्वाआठ वाजता ही घटना घडली आहे. 

अमित कुमार (वय 28) असे या जवानाचे नाव असून, अहेरी येथील प्राणहिता या बटालियन क्रमांक 37 मध्ये ते सेवेत होते. त्यांनी स्वतःच्या रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून आज (शुक्रवारी) सकाळी 8:15 वाजता आत्महत्या केली. तो मूळचा हरियाना राज्यातील आहे. अमित यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पुढील तपास अहेरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश मदने हे करीत आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

    टॅग्स