नादुरुस्त पुलांमुळे 78 गावांचा 2 महिन्यांपासून संपर्कच नाही!

मनोहर बोरकर
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

मागील दोन महिन्यांपासून त्या भागातील 78 गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला

एटापल्ली (जिल्हा गडचिरोली) : तालुक्यातील कसनसुर जारावंडी मुख्य रस्त्यावरून वाहणारे झुरी नाला व कांदळी नाल्यावरील पुलाचे नुकसान झाल्याने परिवहन महामंडळने बस सेवा व इतर वाहतूक बंद झाल्याने मागील दोन महिन्यांपासून त्या भागातील 78 गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. 

सदर दोन्ही पुल क्षतिग्रस्त घोषित करण्याअगोदर प्रशासनाने वाहतुकीस पर्यायी मार्गाची सोय न करता दोन्ही ठिकाणी केवळ फलक लावून वाहतुकीस प्रतिबंध केला आहे. त्यामुळे त्या भागातील नागरिकांना विविध जीवनावश्यक वस्तू खरेदी, तसेच शासकीय कार्यालयीन कामे करण्यास, विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयीन शिक्षण घेण्यास व आजारी रुग्णांना वैद्यकीय उपचार घेण्यास त्रास सहन करावा लगत आहे.

प्रसंगी उपचाराशिवाय जीव गमावण्याची वेळ रुग्णांवर येत आहे. त्यामुळे झुरी व कांदळी या दोन्ही नाल्यावरील क्षेतिग्रस्त पुलांमुळे तालुक्यातील 78 गावांच्या नागरिकांना दळनवळनाची पर्यायी व्यवस्था त्वरित करावी, अन्यथा तिव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा तालुका काँग्रेस अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य संजय चरडुके व नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनातून दिला आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

टॅग्स